कर्ज न भरणे महागात पडलेभुसावळ न . पा .माजी नगरसेविकेचा पुत्र ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |
 

 
कर्ज न भरणे महागात पडले
भुसावळ न . पा .माजी नगरसेविकेचा पुत्र ताब्यात 

 
भुसावळ, 30 ऑगस्ट
पतसंस्थेतुन घेतलेले कर्ज भरले नाही म्हणून भुसावळ नगरपालिकेच्या माजी नगरसेविकेच्या मुलास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
शहरातील विठ्ठल रखुमाई पतसंस्थेतून मोठया प्रमाणावर कर्ज घेवून परतफेड न करणा-या 185 कर्जदारां विरुध्द सन 2011 मध्ये खंडपीठाच्या आदेशाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात ऑडीटर संजय कळंत्री यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यागुन्हयाचा तपास जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या नंतर काही महिन्यांपासून तपासाला गती देण्यात आली. आत अनेक कर्जदारंवर अटकेची कारवाई केली जात आहे. गुरुवारी भुसावळ नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुशीला अहिरे यांचे पूत्र जीवन दत्तू अहिरे वय 35 रा. उंट मोहल्ला यांच्यासह गजेंद्र शालीग्राम सैनी व साजीद खान मोहम्मद खान रा.खडकारोड भुसावळ यांना अटक करण्यात आली. अहिरे यांच्यावर 24 लाख तर सैनी यांच्यावर 9 लाख तसेच साजीद यांच्यावर 14 लाखांचे कर्ज असल्याचे समजते. आरोपींना न्यायमुर्ती गरड यांच्या न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, प्रभारी उपअधिक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विजय देशमूख, हवलदार प्रवीण जगताप, जीवन पाटील, अधिकार पाटील, दिलीप चव्हाण, रविंद्र परदेशी यांचा यात समावेश होता.
 
@@AUTHORINFO_V1@@