उज्ज्वला योजनेतून नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास यश: एचपीसीएलचे अध्यक्ष एम. के. सुराणा यांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |




मुंबई : पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे गावोगावी गॅस जोडणी पोहोचली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) त्याचा एक भाग आहे, याचा आम्हाला आनंद आहे, असे अध्यक्ष मत एम. के. सुराणा यांनी व्यक्त केले. एचपीसीएलची ६६ वी सर्वसाधारण सभा गुरुवारी मुंबइत पार पडली त्यावेळी ते बोलत होते.  पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असताना ग्राहकांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर विकत घेण्याची मानसिकता तयार होत आहे. केंद्र आणि राज्यांकडून दिले जाणारे अनुदान यामुळे या योजनेकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

 

सरकारी आकडेवारीनुसार, सध्या १० कोटी एलपीजी जोडणी पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे करण्यात आली आहे. एचपीसीएलतर्फे २०१७ -१८ या आर्थिक वर्षात ६ .१ दशलक्ष टन एकूण एचपीसीएलची विक्री झाली आहे. इंधन आणि वायु क्षेत्रातील सुमारे ४८ टक्क्यांहून अधिक हिस्सा कंपनीकडे असून कंपनीने दुसरे स्थान कायम ठेवले आहे. उज्ज्वला योजनेतून एचपीसीएलतर्फे २०१७ -१८ मध्ये ७७ लाख नव्या एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत एचपीसीएलतर्फे ८८६ ठिकाणी वितरण शिबिरे घेण्यात आली आहेत. त्याद्वारे 85 हजारांहून अधिक जणांनी याचा लाभ घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

कंपनीला तिमाहीत १७१९ कोटींचा नफा

गेल्या तिमाहीत कंपनीला १ हजार ७१९ कोटींचा निव्वळ नफा झाला. कंपनीला सलग दुसर्‍या आर्थिक वर्षात ६ हजार ३५७ कोटींचा नफा झाला आहे. येत्यावर्षात ७ हजार २१९ कोटींचा निव्वळ नफा कंपनीला अपेक्षित आहे, अशी माहिती अध्यक्ष एम. के. सुराणा यांनी यावेळी दिली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@