धरणगाव बँकेच्या एटीएम कार्डधारकाच्या परिवाराला दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |

अपघातातील मृत कुटुंबप्रमुखाच्या वारसांना विमा रक्कम

 
जळगाव :
ऐन उमेदीत घरातील कर्त्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचा परिवाराला एटीएमकार्डधारक म्हणून १ लाखाची विमा रक्कम मिळवून दिलासा देण्यात जळगावच्या धरणगाव बँक शाखेला यश आले आहे. अन्य ३ बड्या बँकांनी दाखवलेल्या अनास्थेच्या पार्श्‍वभूमीवर सहकार क्षेत्रातील बँकेच्या या संवेदनशील व कर्तव्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यातील खान्देशातील अशी ही पहिली घटना असावी.
 
 
भीषण अपघात...
जळगाव येथे खाजगी प्रतिष्ठान मुंदडा ट्रेडर्समध्ये सेवा देणारे नारायण जानकीराम बोरसे (वय ३९ ,मूळ रा.निंभोरा ता.धरणगाव) हे २५ एप्रिल २०१८ च्या रात्री ९ च्या सुमारास खोटेनगराच्या पुढे डावीकडे असलेल्या बिबानगरात दुचाकीने घरी परतत होते. शिवकॉलनीजवळ त्यांना मागून एका ट्रॉलाने जबर धडक दिली. त्यात नारायण यांच्या एका पायावरुन चाक गेले, पायाचा चेंदामेंदा होत जागीच खूप रक्तस्त्राव झाला. परिणामी रक्तदाब कमी झाला. अखेर खाजगी रुग्णालयात दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
 
 
यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा महापहाड कोसळला. घराचा कर्ता गेल्याने आई, पत्नी स्वाती, २ मुलं (पहिलीतील लोकेश आणि आठवीतील निलेश) यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. या बिकट स्थितीत स्वाती यांचे बंधू आणि स्व.नारायण यांच्यासोबत खाजगी नोकरी करणारे दीपक पाटील व अन्य आप्तांनी मोलाची साथ दिली. योगायोगाने नारायण बोरसे यांनी धरणगाव बँकेचे सभासद, खातेदार म्हणून रुपे एटीएम कार्ड घेतले होते. जागतिक स्तरावर कार्यरत या एटीएमकार्डधारकाला अपघाती मृत्यूचे विमा संरक्षण होतेच.रितसर दस्तावेजाची पूर्तता झाल्यावर धरणगाव बँकेच्या जळगाव शाखेत स्वातीताई बोरसे यांना पाचारण करण्यात आले आणि संबंधित विमा कंपनीतर्फे एक लाखाचा धनादेश त्यांना देण्यात आला. ही रक्कम परिवाराने बँकेत ठेवरुपात गुंतवली आहे. तिच्या व्याजावर परिवाराचा जीवनावश्यक खर्च भागवण्याचा प्रयत्न होत आहे.
 
 
धनादेशवितरण जळगाव शाखेत झाले. बँकेतील वंदना सूर्यवंशी, बँकेच्या हितचिंतक सुरेखा भगवतीप्रसाद मुंदडा, स्वाती बोरसे, नरेंद्र साखरे, बँक परिवारातील हेमंत येवले व अधिकारी प्रफुल्ल अग्निहोत्री, शाखाधिकारी प्रवीण राजपूत आदी उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया आणि सहकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी आणि शाखाधिकारी प्रवीण राजपूत, अधिकारी प्रफुल्ल गुजराथी, नंदकिशोर जाधव आदींनी पाठपुरावा करीत बोरसे परिवाराला दिलासा दिला.
सहकारी बँकेची कर्तव्य तत्परता
बोरसे हे अन्य ३ बड्या बँकांचे रुपे एटीएम कार्डधारक, पण त्यांच्या स्थानिक व उच्चपदस्थ सुत्रांनी विमा संरक्षण रकमेबाबत कमालीची अनास्था दाखवली. अखेर येथल्या मातीत रुजलेल्या व सहकार क्षेत्रात समाज व देशहितासाठी दक्ष असलेल्या धरणगाव नागरी सहकारी बँकेने हा मदतीचा हात दिला.
 
@@AUTHORINFO_V1@@