सणासुदीला सगळ्यांमध्ये उठून दिसायचंय? मग 'हे' करा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2018
Total Views |



 

श्रावण महिना सुरू झाला की एकापाठोपाठ एक-एक सण यायला सुरु होते. या सणासुदीच्या काळात समस्त महिला वर्गाला मात्र एकच प्रश्न पडलेला असतो. तो म्हणजे मी कोणती साडी नेसू?, कोणता ड्रेस घालू?, त्यावर कोणते दागिने मॅच होतील?, मग मेकअप कसा करू? मग ऐनवेळी धावपळ सुरु होते. म्हणूनच हि धावपळ टाळण्यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ऐनवेळी धावपळ होणार नाही...
 

 
 सणासुदीला सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी खास टिप्स

 

१. साडी नेसण्याचा विचार करत असाल तर कोणती साडी तुम्हाला शोभून दिसेल, तसेच कोणत्या रंगाची साडी तुमच्या त्वचेच्या रंगाला शोभेल याचा विचार करा.

२. गणपती, नवरात्रीच्या काळात पाऊस अधूनमधून पडत असतो. त्यामुळे अशा वातावरणात जास्त भरजरी वर्क केलेली साडी नेसणे शक्यतो टाळाच.

३. नऊवारी साडी नेसण्याचा विचार करत असाल तर ती शिवून देखील घेऊ शकता.

४. ड्रेस किंवा इतर काही घालण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर तुम्हाला स्कर्ट-ब्लाऊज, किंवा लांब कुर्ती, घेरदार अनारकली असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

५. आजकाल काही ऑनलाईन साईट्समार्फत मोठमोठ्या फॅशन डिझाईनर्सने डिझाईन केलेल ड्रेस भाड्यानेदेखील घेता येतात.

६. तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांवर दागिने घालताना त्यांची विचार करून निवड करा. साडी असो वा ड्रेस त्यावर हातात डझनभर बांगड्या घालण्यापेक्षा एखादा कडाही हातात शोभून दिसेल.

७. गळ्यात एखादी नाजूकशी साखळीची सर घातल्याने गळा मोकळा वाटणार नाही.

८. कानात ऑक्साईडचे सोनेरी किंवा चंदेरी रंगाचे मोतीजडित झुमके तुम्ही घातलेल्या कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवरही शोभून दिसतील.

९. सतत दर सणासुदीला झुमके घालून तुम्ही कंटाळला असाल तर त्या त्या ड्रेसवर शोभतील असे रंगीत बटणाच्या आकाराचे कानातले तुम्ही घालू शकता.

१०. जास्त मेकअप करण्यापेक्षा कधीकधी फक्त डोळ्यांना काजळ लावल्याने व एखादी गडद रंगाची लिपस्टिक लावल्यानेदेखील सौंदर्य खुलते.

- साईली भाटकर 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@