'लोकसभेत इव्हीएम नको मतपत्रिका हवी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |

देशातील १७ राजकीय पक्षांची इव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाकडे मागणी






नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्यामुळे विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा इव्हीएमच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उठवला जात आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर हा वाद आणखी वाढला असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये इव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. यासाठी देशभरातील १७ राजकीय पक्ष एकत्र आले असून लवकरच याविषयी निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात येणार आहे.

कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी कॉग्रेससह एकूण १७ पक्षांनी ही मागणी केली आहे. तृणमूल अध्यक्षा ममता बनर्जी यांनी नुकताच दिल्ली दौरा केला आहे. या दौऱ्यामध्ये त्यांनी दिल्लीतील सर्व बड्या नेत्यांची भेट घेतली. याभेटीनंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा इव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी म्हणून निवडणूक आयोगाने येत्या लोकसभेत इव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. तसेच पुढील आठवड्यात यासंबंधी चर्चेसाठी विरोधकांचे एक शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना याविषयी निवेदन देणार असल्याचे देखील विरोधकांकडून सांगण्यात आले आहे.
 
 
दरम्यान यासाठी आणखी एक काही पक्षांचा पाठींबा मिळवण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना आणि टीडीपी या दोन पक्षांच्या पाठींबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवसेना आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष सध्या भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत, त्यामुळे इव्हीएमविरोधात हे दोन पक्ष विरोधकांना पाठींबा देतील, असा विश्वास विरोधकांना वाटत आहे.
@@AUTHORINFO_V1@@