मराठा आरक्षणावर १४ ऐवजी ७ तारखेला अंतिम सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |

मराठा तरुणांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा निर्णय




मुंबई : मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावर येत्या ७ तारखेला अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. आरक्षण मिळावे यासाठी म्हणून मराठा तरुण हे आत्महत्येचा मार्ग निवडत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत निघाले आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकरातलवकर सुनावणी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आज म्हटले आहे.


सकल मराठा समाजाच्या वतीने विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये याविषयी याचिका दाखल केली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अधिक गंभीर होत असून न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी अलीकडे घेऊन त्यावर सुनावणी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या अगोदर न्यायालयाने अंतिम सुनावणीसाठी १४ ऑगस्ट ही तारीख दिली होती. परंतु आज सकाळी आणखी एका मराठा तरुणाने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही तारीख अलीकडे घेत, ७ तारखेला याप्रकरणी अंतिम निर्णय देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मागासवर्गीय आयोगाला आणि राज्य सरकारला यासंबंधीची सर्व कागदपत्रे लवकरात लवकर न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@