ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तीन जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |


बदलापूरजवळील रहाटोलीतीळ घटना

बदलापूर - बदलापूर जवळील राहटोली येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या झालेल्या स्फोटात तीन जण जखमी झाले असून त्यापैकी चंद्रकांत जगताप गंभीररित्या भाजलेल्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत,

 

राहटोली येथील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा बुधवारी दुपारी मोठा आवाज होऊन स्फोट झाला; आणि त्यामधील उकळते ऑइल जोराने बाहेर फेकले गेले. त्यावेळी ट्रान्सफॉर्मर जवळून जाणारे जगताप यांच्या अंगावर हे ऑइल पडले. त्यामुळे जगताप यांच्या अंगावरील कपड्यांनीही पेट घेतला. त्यांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थांनी धाव घेऊन पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर या आगीत गंभीररित्या भाजलेल्या जगताप यांना उपचारार्थ डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यावेळी गावातील इतर दोन व्यक्तीनाही किरकोळ दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जगताप यांना महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.

 

राहटोली येथील विठ्ठल मंदिराजवळ ज्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आहे,तो गेल्या वर्षभरात याठिकाणी बसविण्यात आलेला चौथा ट्रान्सफॉर्मर आहे. याठिकाणी ट्रान्सफॉर्मर स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ असली तरी यापूर्वी सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे दर दोन-तीन महिन्यांनी म्हणजे सलग तीन वेळा ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@