जळगाव मनपात कमळ फुलले माजी आ.सुरेश जैन यांचा 40 वर्षांचा किल्ला ढासळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |
 
 
 

 
 
 
जळगाव मनपात कमळ फुलले  
 माजी  आ.सुरेश जैन यांचा 40 वर्षांचा किल्ला ढासळला
जळगाव , 3 ऑगस्ट
जळगाव महानगर पालिकेच्या 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान झाले. 3 ऑगस्ट रोजी एमआयडीसमध्ये मतमोजणी झाली.यात मतदारांनी 75 पैकी 57 जागी भाजपा उमेदवार, 15 जागा शिवसेना व 3 जागा एएमआयएमच्या निवडुन दिल्या. मतदारांनी शिवसेनेला नाकारले आहे.
जळगाव शहरात सलग 40 वर्षे माजी आ. सुरेश जैन यांचेच वर्चस्व राहिले. मनपाच्या या सार्वत्रिक निवडणुकित भाजपाचे अंतर्गत कलहसुध्दा समोर आले. काही लोकांनी शहरात बहुसंख्य असलेल्या लेवा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न झाला. परंतु इतर समाजांप्रमाणे लेवा समाज भाजपाच्या पाठिशी खंबीरपणे उभाराहिला आणि जळगावात इतिहास घडला. भाजपाने स्व:बळावर मनपात सत्ता हस्तगत केली. माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यंानीसुध्दा बैठका घेतल्या. जळगाव मनपात भाजपाची सत्ता असावी असे आ.खडसेंचे अनेक वर्षांपासून स्वप्न होते.
ना.गिरीश महाजन यांनी जाहिरसभांमध्ये कोणावर टिका करण्यापेक्षा विकासाचा अजंंेंडा मांडला आणि तोच जळगावकरांना भावला. त्यामुळे जळगावकरांनी 2019 ला होणाच्या निवडणुकिचे संकेत आताच दिले असल्याचे जाणकार बोलत आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ
मनपा निवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरावरील व स्थानिक नेत्यांनी डरकाळया फोडल्या होत्या परंतु प्रचारात या डरकाळया कोठेही ऐकण्यास आल्या नाही. प्रत्यक्षात राज्यस्तराचे पक्षाचे नेते जळगावात फिरकलेच नाही. काँग्रेसच्या 4 उमेदवारांना निवडुन आणण्याची जबाबदारी घेतली असून त्यांना निवडुन आणणारच अशी घोषणा करणारे काँग्रेसचे आ.अब्दुल सत्तार जळगावात फिरकलेच नाही. 20 वर्षांपासुन काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडुन आलेला नाही . राष्ट्रवादीने ज्या जागा गेल्या निवडणुकित जिंकल्या होत्या त्यासुध्दा त्यांना सांभाळता आल्या नाही.
एएमआयएमला तीन जागा
एएमआयएम पक्षाने 6 जागा लढविल्या त्यातील 3 जागी त्यांना विजश्री मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समाजवादीपक्षापेक्षा या पक्षाची स्थिती मजबुत राहिली.
जळगाव मनपाचे विजयी उमेदवार
प्रभाग क्र. १
(अ) जोहेर प्रिया मधुकर (भाजपा)
(ब) नेरकर सरिता अनंत (भाजपा)
(क) पोकळे दिलीप बबनराव (भाजपा)
(ड) खान रुक्सानाबी गबलु (भाजपा)
प्रभाग क्र. २
(अ) सोनवणे कांचन विकास (भाजपा)
(ब) दारकुंडे नवनाथ विश्वनाथ (भाजपा)
(क) शिंदे गायत्री उत्तम (भाजपा)
(ड) बाविस्कर किशोर रमेश (भाजपा)
प्रभाग क्र. ३
(अ) सपकाळे मीना धुडकू (भाजपा)
(ब) कोळी दत्तात्रय देवराम (भाजपा)
(क) सपकाळे रंजना भरत (भाजपा)
(ड) कोल्हे प्रवीण रामदास (भाजपा)
प्रभाग क्र. ४
(अ) सनकत चेतन गणेश (भाजपा)
(ब) सोनवणे भारती कैलास (भाजपा)
(क) चौधरी चेतना किशोर (भाजपा)
(ड) सोनवणे मुकुंदा भागवत (भाजपा)
प्रभाग क्र. ५
(अ) भंगाळे विष्णु रामदास (शिवसेना)
(ब) सोनवणे राखीबाई श्यामकांत(शिवसेना)
(क) तायडे ज्योती शरद (शिवसेना)
(ड) लढ्ढा नितीन बालमुकुंद(शिवसेना)
प्रभाग क्र. ६
(अ) काळे अमित पांडुरंग (भाजपा)
(ब) चौधरी मंगला संजय (भाजपा)
(क) हाडा सुचिता अतुलसिंह (भाजपा)
(ड) सोनवणे धीरज मुरलीधर (भाजपा)
प्रभाग क्र. ७
(अ) भोळे सीमा सुरेश (भाजपा)
(ब) काळे दीपमाला मनोज (भाजपा)
(क) अश्विन शांताराम सोनवणे (भाजपा)
(ड) पाटील सचिन भीमराव (भाजपा)
प्रभाग क्र. ८
(अ) चौधरी मनोज सुरेश (शिवसेना)
(ब) भोईटे लताबाई रणजित (भाजपा)
(क) पाटील प्रतिभा सुधीर (भाजपा)
(ड) पाटील चंद्रशेखर शिवाजी (भाजपा)
प्रभाग क्र.९
(अ) कापसे मयूर चंद्रकांत (भाजपा)
(ब) कापसे प्रतिभा च्रंदकांत (भाजपा)
(क) देशमुख प्रतिभा गजानन (भाजपा)
(ड) पाटील विजय पुंडलिक (भाजपा)
प्रभाग क्र.१०
(अ) सोनवणे सुरेश माणिक (भाजपा)
(ब) बारी शोभा दिनकर (भाजपा)
(क) शेख हसीनाबाई शरीफ (भाजपा)
(ड) पाटील कुलभूषण वीरभान (भाजपा)
प्रभाग क्र.११
(अ) भील पार्वताबाई दामू (भाजपा)
(ब) पाटील उषा संतोष (भाजपा)
(क) कोल्हे सिंधु विजय (भाजपा)
(ड) कोल्हे ललित विजय (भाजपा)
प्रभाग क्र.१२
(अ) बरडे नितीन मनोहर (शिवसेना)
(ब) बेंडाळे उज्ज्वला मोहन (भाजपा)
(क) राणे गायत्री इंद्रजित (भाजपा)
(ड) जोशी अनंत हरिश्‍चंद्र (शिवसेना)
प्रभाग क्र. १३
(अ) तायडे सुरेखा नितीन (भाजपा)
(ब) चव्हाण ज्योती बाळासाहेब (भाजपा)
(क) मराठे जितेंद्र भगवान (भाजपा)
(ड) सोनवणे अंजनाबाई प्रभाकर (भाजपा)
प्रभाग क्र. १४
(अ) पाटील रेखा चुडामण (भाजपा)
(ब) सोनवणे सुरेखा सुदाम (भाजपा)
(क) ढेकळे सदाशिव गणपत (भाजपा)
(ड) पाटील राजेंद्र झिपरू (भाजपा )
प्रभाग क्र.१५
(अ) महाजन सुनील सुपडू (शिवसेना )
(ब) महाजन जयश्री सुनील (शिवसेना)
(क) शेख शबानाबी सादीक (शिवसेना)
(ड) नाईक प्रशांत सुरेश (शिवसेना)
प्रभाग क्र. १६
(अ) बालाणी भगतराम रावलमल (भाजपा)
(ब) अत्तरदे रजनी प्रकाश (भाजपा)
(क) काळे रेश्मा कुंदन (भाजपा)
(ड) आहुजा मनोज नारायणदास (भाजपा)
प्रभाग क्र.१७
(अ) पाटील मीनाक्षी गोकुळ (भाजपा)
(ब) सोनार रंजना विजय (भाजपा)
(क) खडके सुनील वामनराव (भाजपा)
(ड) खडके विश्वनाथ सुरेश (भाजपा) 
प्रभाग क्र.१८
(अ) बागवान रियाज अहमद अब्दुल करीम (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(ब) देशमुख सुन्नाबी राजू
(ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(क) शेख सैईदा युसुफ
(ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(ड) पटेल इब्राहिम मुसा (शिवसेना)
प्रभाग क्र.१९
(अ) सोनवणे लताबाई चंद्रकांत (शिवसेना)
(ब) सोनवणे विक्रम किसन (शिवसेना पुरकृत, अपक्ष)
(क) भापसे जिजाबाई अण्णासाहेब (शिवसेना पुरकृत, अपक्ष)
@@AUTHORINFO_V1@@