संसदेत राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली :  संसदेत आज एक मोठे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रात देशाच्या विकासासाठी संसदेत आज राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर करण्यात आले आहे. "देशातील खेळाडूंना तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व नागिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे." अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौड यांनी आज संसदेत दिली.
 
 
 
 
२०१९ पर्यंत संपूर्ण जगात क्रीडा क्षेत्राची किंमत ८० बिलियन डॉलर असेल. आर्थिक दृष्ट्या तसेच खेळाडूंच्या निर्मितीच्या दृष्टीने या शर्यतीत आपण उतरणे आवश्यक झाले आहे. आपल्या देशाचे दुर्दैव कि, आतापर्यंत आपल्या देशात क्रीडा क्षेत्राला संपूर्णपणे समर्पित एकही विद्यापीठ नव्हते. विविध संस्था किंवा महाविद्यालय होते, मात्र संपूर्ण क्रीडा क्षेत्राला समाविष्ट करणारे विद्यापीठ नव्हते. येत्या काळात देशाला क्रीडा क्षेत्रात उंचीवर नेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे." असेही राठौर यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
 
मणिपुर येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना :

"हे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मणिपुर येथे स्थापन करण्यात येणार आहे. या विद्यापीठाचे 'आउटलाईन कॅम्पस' भविष्यात देशातील विविध राज्यांमध्ये तसेच परराष्ट्रांमध्ये देखील स्थापन करण्याचा आमचा मानस आहे."
केवळ खेळाडूच नाही तर रेफरी, एम्पायर, आणि संशोधकांनाही लाभ :
 
यामुळे केवळ देशात खेळाडूच नाहीत तर त्यासोबत रेफरी, एम्पायर आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल. इथे मिळणाऱ्या स्नातक आणि स्नातकोत्तर पदवींचा या खेळाडूंना तसेच रेफरी आणि एम्पायर्सना देखील फायदा होईल. असेही राठौड यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@