प्लास्टिक निर्मिती व साठा करणारे दोन कारखाने सील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |


 

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका प्रशासनाने प्लास्टीक निर्मिती व साठा करणा-यां विरोधात धडक कारवाई करत काल रात्रीच्या सुमारास दोन प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सील ठोकले असून सहा दुकान दारांवर प्लास्टिक बाळगल्या प्रकरणी दंड आकारण्यात आला आहे.
 

शहरात काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस कारखान्यात प्लास्टिक निर्मिती व साठा ठेवला जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाला मिळाली होती त्यानुसार त्यावर पंधरा दिवस पाळत ठेवून काल रात्री साडे आठ वाजता मनपा आयुक्त गणेश पाटील यांच्या आदशांनव्यें मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मुकादम व काही कर्मचारी यांनी धाड टाकून कॅम्प नंबर तीन मधील अक्षय प्लास्टिक आणि कॅम्प नंबर एक मधील दिप प्लास्टिक या कारखान्यांमध्ये एक टनांवरून जास्त प्लास्टिक आढळून आल्याने त्यांना पालिकेने सिल ठोकले. तर या कारवाई दरम्यान सहा विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या दुकाणात आढळून आल्याने त्यांचे वर पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@