निरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
ब्रिटेन : भारतीय बँकांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला कुप्रसिद्ध सोने व्यापारी निरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने ब्रिटनकडे आज मागणी केली आहे. यासंदर्भात भारताने ब्रिटनकडे प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी निरव मोदी याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होता. पंजाब नॅशनल बँकेचे हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेल्या निरव मोदीवर सध्या भारत सरकार लक्ष ठेवून आहे. 
 
 
निरव मोदी गेल्या अनेक महिन्यापासून विदेशात फरार झाला आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनांनी त्याच्यावर नजर ठेवा असे आदेश इंटरपोलने दिले आहेत. एखाद्या देशातील गुन्हेगार जर विदेशात पळून जावून लपून राहत असल्यास त्याच्यावर इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करीत असते. या नोटीसमध्ये या व्यक्तीवर पाळत ठेवली जात असून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून नजर ठेवली जात असते. 
 
 
खोटी हमी देवून हा इतका मोठा घोटाळा करण्यात आला असून सध्या निरव मोदी यांच्या ११ राज्यांमधील ३५ ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. तसेच निरव मोदी यांच्या २९ जागा आणि १०५ बँक खाते देखील आतापर्यंत गोठवण्यात आली आहेत. २०११ पासून निरव मोदी व्यवहारासाठी खोटा परवाना वापरात होता. निरव मोदी याच्या विरुद्ध सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, आयटी आणि डीआरआय हे विभाग कसून चौकशी करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@