जम्मू-काश्मीरमध्ये एसबीआय शाखेजवळ ग्रेनेड हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |
 

 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये असलेल्या एसबीआयच्या शाखेजवळ आज दहशतवाद्यांकडून ग्रेनेट हल्ला करण्यात आला आहे. तसेच डीसी कार्यालयाजवळ देखील गोळीबार करण्यात आला आहे. हा हल्ला आज सकाळी अचानक झाल्याने आसपासच्या परिसरात शांतता पसरली तसेच सगळ्या जवळच्या भागामध्ये सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 
 
 
काल सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले असल्याने त्याचा बदल म्हणून हा हल्ला करण्यात आला असे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या आसपासच्या परिसरात अलर्ट घोषित करण्यात आला असून लोकांना घराबाहेर येण्यास मनाई करण्यात आली आहे. 
 
 
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे काल सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना मारले होते. सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत झालेल्या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यामुळे सध्या सगळ्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@