मासळी विक्रेत्यांना पर्यायी साधने द्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |


 

शीतल गंभीर यांची मागणी
 

मुंबई : मासळी विक्रेते मासे बर्फात साठविण्यासाठी थर्माकोलचा वापर करतात. परंतु महाराष्ट्रात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी करण्यात आली आहे. थर्माकोलला पर्यायी म्हणून वापरले जाणारे फायबरचे खोके महाग असतात त्यांना ते परवडत नाही. त्यामुळे नगरसेवक निधीतून मासळी विक्रेत्यांना फायबरचे खोके उपलब्ध करून देता यावे अशी मागणी भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर यांनी ठरावाच्या सूचनेव्दारे केली आहे.

 

शीतल गंभीर सांगितले की , राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु याचा मोठा फटका मुंबईतील मासळी विक्रेत्यांना बसत आहे. विक्रीसाठी आणलेलं आणि नंतर शिल्लक राहिलेले मासे साठविण्यासाठी थर्माकोलचा वापर करावा लागतो ,परंतु थर्माकोल बंदी अंतर्गत त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे मासळी साठविण्यासाठी पर्याय काय हा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. मासळी ठेवायला योग्य प्रकारचे खोके उपलब्ध नसल्यामुळे मासे खराब होऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. थर्माकोलचा पर्याय म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक आणि फायबरच्या किंमत जास्त असल्यामुळे त्यांना परवडत नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व परवानाधारक मासळीविक्रेत्यांना मसलाई सुरक्षित राहण्यासाठी पर्यावरणपूरक फायबरचे उष्णतारोधक खोके नगरसेवक निधीतून पुरविता येतील यासाठी नगरसेवकांच्या निधीच्या निकषांमध्ये बदल करण्यात यावेत असे गंभीर यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@