गणितज्ञ अक्षय वेंकटेश फील्ड पुरस्काराने सन्मानित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
रिओ डी जेनेरिओ : भारतीय वंशाचे गणितज्ञ अक्षय वेंकटेश यांना फील्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फील्ड पुरस्काराला गणित क्षेत्रातील नोबेल परितोषिक मानले जाते. ब्राझीलमधील रिओ डी जनेरिओमध्ये बुधवारी अक्षय वेंकटेश यांना फील्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये ३६ वर्षांच्या अक्षय वेंकटेश यांना पुरस्कार देण्यात आला आहे. 
 
 
चार वर्षांमध्ये एक वेळा फील्ड पुरस्कार दिला जातो तसेच ४० वर्षांच्या कमी असलेले गणितज्ञ यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. अक्षय वेंकटेश स्टैनफोर्ड विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत. फील्ड पुरस्कार मिळविणारे अक्षय वेंकटेश हे भारतीय वंशाचे दुसरे व्यक्ती आहे. त्यांच्या आधी २०१४ मध्ये मंजुल भार्गव यांनी हा पुरस्कार आपल्या नावावर केला होता. 
 
 
अक्षय वेंकटेश याचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला आहे. जेव्हा ते २ वर्षांचे होते तेव्हा त्यांचे आईवडील त्यांना घेवून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेत. आता सध्या अक्षय वेंकटेश हे स्टैनफोर्ड विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत. 
 
@@AUTHORINFO_V1@@