सोशल मीडियामुळे वाचला या चिमुकलीचा जीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |

 
 
बंगळुरु :  समाज माध्यमांमध्ये खूप ताकद आहे, याची प्रचिती आपल्याला या न त्या कारणाने गेल्या अनेक वर्षांमध्ये आलेली आहेच. मात्र गेल्या काही काळात सोशल मीडियामुळे कसे दंगे भडकतात, यामुळे किती लोकांचा जीव गेला, मॉब लिंचिगं असेच प्रकार समोर आले आहेत. मात्र हे सगळं होत असतानाच याच सोशल मीडियामुळे एका लहान मुलीचा जीवही वाचल्याची घटना घडली आहे.
 
 
 
 
मणिपुर येथील रिचेल नावाच्या छोट्या बाळाला फुफ्फुसाचा आजार होता. फुफ्फुसात पाणी झाल्यामुळे तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. तिची आई एक अनाथ तसेच विधवा देखील आहे, आईची परिस्थिती हलाकीची असल्या कारणाने बाळाच्या उपचाराचा खर्च पेलवणे तिला शक्य नव्हते अशा परिस्थितीत गिरीश अलवा यांनी ट्विटरवर #SaveRachel कॅम्पेन चालवले. या कॅम्पेनच्या माध्यमातून बाळाच्या खर्चासाठी पैसे गोळा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, जेणे करुन लहान बाळाला जीवनदान मिळू शकेल. त्यांच्या या प्रयत्नांना २४ तासांच्या आत भरगोस प्रतिसाद मिळाला आणि प्रयत्नांना यश आले असून वेळेवर बाळाची शस्त्रक्रिया होऊ शकली.
 
गिरीश अलवा यांनी आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून मदत करणाऱ्या लोकांची माहिती देखील दिली आणि मदत करणाऱ्या लोकांचे आभार देखील मानले. लुईखॉम लक्सन यांनी या बाळाला आर्थिक मदत केली आहे. तसेच इतर संस्थांची देखील माहिती त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली. त्यांनी रुग्णालयाचा नंबर देखील ट्विटर वरुन प्रसिद्ध केला, जेणे करुन ही घटना खरी आहे का नाही याची तपासणी नागरिक करु शकतील.
 
 
 
 
मणिपुर येथील मुख्यमंत्र्यांनी केली चौकशी :
 
सोशल मीडियावरुन सुरु करण्यात आलेले हे कॅम्पेन मणिपुरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्यापर्यंत देखील पोहोचले. तसेच त्यांनी याविषयी चौकशी केली असून त्यांनी शस्त्रक्रियेनंतरची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. या निमित्ताने एका गरजू आणि गरीब परिवाराला मोठी मदत मिळाली असून एका चिमुकल्या बाळाचे जीव वाचले आहेत.
 
ज्याप्रमाणे सोशल मीडियावरुन अंधविश्वास ठेवून लोकं दंगे देखील पसरवतात, त्याप्रमाणे किंबहुना त्याहून जास्त प्रमाणात लोक सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी देखील करतात. गिरीश अलवा याचेच एक उदाहरण आहेत. त्यांच्या या कॅम्पेनमुळे एका चिमुकल्या बाळाचे जीव वाचले आणि या बाळाला जीवनदान मिळाले.
@@AUTHORINFO_V1@@