भाजपाला एकसंधतेचा लाभ ; सेनेमध्ये फुट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2018
Total Views |

 
 
भाजपाला एकसंधतेचा लाभ ;  सेनेमध्ये फुट
जळगाव, 3 ऑगस्ट
जळगाव महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणुकिसाठी मतदान 1 ऑगस्ट रोजी झाले आणि 3 रोजी मतमोजणी झाली यात भाजपाने जळगाव शहरात 40 वर्षांपासून माजी आ. सुरेश जैन यांची असलेली सत्ता उलढावून लावली. यामागची कारणमीमास तपासली असता भाजपाचे कार्यकर्ते व उमेदवार एकसंध राहिले तर सेनेत फुट पडली.
 
भाजपा उमेदवारांनी आणि कार्यकत्र्यांनी मतदारांना मते मागतांना पॅनलसाठी मते मागीतली. प्रचाराच्या पहिल्या फेरीपासुन मतदान होई पर्यंत भाजपाने पॅनलसाठीच मतदान मागीतले. या उलट शिवसेनेमध्ये फुट पडली आणि 29 रोजी प्रचार संपल्या नंतर उमेदवारांनी पॅनलचा विचार न करता स्वत:साठी स्वतंत्रपणे मतांचे नियोजन केले.याचाच फटका शिवसेनेला अधिक बसला. 40 वर्षांपासून सलग (दोन वर्षांचा अपवाद वगळता) माजी आ. सुरेश जैन यांचेच आणि नगर पालिका नंतर मनपावर वर्चस्व राहिले.याचा नकारात्मक प्रभावसुध्दा यानिवडणुकित दिसुन आला.
 
ना. महाजन ठरले किंग मेकर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहिरसभांमधुन कोणत्याही व्यक्तीवर टिका केली नाही. त्यंानी केवळ विकासाचाच अजेंडा मांडला. केवळ एकदा संधी द्या वर्षभरात विकास केला नाही तर विधानसभेला आ. सुरेश भोळे यांच्यासाठी मते मागायला येणार नाही असे ठासुन सांगीतले होते. महाजन यांचे हे उदगार प्रभावी ठरले. भाजपाने वर्तमानातील मुद्दांना हात घातला तर सेनेनेच्या जाहिरा नाम्यात जुनेच मुद्दे अधिक होते.
राष्ट्रवादीच्या डरकाळया हवेतच विरल्या.
 
एएमआयएमचा मनपात प्रवेश
कधी काळी जिल्हयात क्रमांक एकचा पक्ष राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला या निवडणुकित खातेसुध्दा उघडता आले नाही. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्या नंतर पक्षांतर केलेले उमेदवार निवडुनच येणार नाही असे ठळक वक्तव्य जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतिश पाटील यांनी केले होते. पक्षाचे निरिक्षक जळगावात आले तेव्हा ना.धनंजय मुंडे, आ.अजित पवार यांच्या सभा जळगावात होतील आणि ते प्रत्येक प्रभाग पिंजून काढतील अशा घोषणा केल्या होत्या . प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुर्ण प्रभागांसाठीसुध्दा उमेदवार नव्हते. मोठया नेत्यांनी जळगावकडे सपशेल पाठ फिरवली. जिल्हा पदाधिकारी असलेल्यांनीसुध्दा निवडणुकित उमेदवारांना वा-यावर सोडले. त्यामुळे या पक्षास गेल्या निवडणुकित जिंकलेल्या जागा सुध्दा राखता आल्या नाही. या उलट कोणतेही बलाबल नसलेल्या एएमआयएम ने 3 जागा जिंकत मनपात प्रवेश केला आहे.
होतेच काय ? की , नुकसान होईल
काँग्रेसची स्थिती
गेल्या 20 वर्षांपासून पालिका सभागृहात काँग्रेसचा एकसुध्दा सदस्य नाही. या निवडणुकित काँग्रेस खाते उघडेल असा अंदाज बांधला जात होता. सोयगावचे विधानपरिषदेचे आ.अब्दुल सत्तार यांनी जळगाव येथे बैठका घेवून 4 जागा निवडुन आणण्याची जबाबदारी घेतली असल्याचे छातीठोक सांगीतले होते.परंतु याबैठकांनंतर आ. सत्तार जळगावला फिरकलेच नाही आणि त्यांनी जबाबदारी घेतलेले 4 उमेदवार कोण होते हे सुध्दा कधी कळलेच नाही.
समाजवादी पक्ष, बसपा आणि अन्य पक्षंाचे मनपा प्रवेशाचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.
जातीचा फॅक्टर कुचकामी ठरला
लेवा समाजातील मतांची विभागणी करण्यासाठी काही लोकांन या समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात आला.परंतु अन्य समाजांप्रमाणेच लेवा समाज भाजपाच्या पाठिशी राहिला. लेवा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करणारे तोंडावर पडले.
 
@@AUTHORINFO_V1@@