शिवसेनेची पुन्हा एकदा स्वबळाची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |



मुंबई : भारतीय जनता पक्षासह केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेनी आता पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूका लढवणाची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेनी लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच येत्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सेना आपल्या उमेदवारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतमध्ये सर्व शिवसेना नेत्यांची काल रात्री बैठक पार पडली आहे. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सेना भाजपबरोबर जाणार नसल्याचे पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा सेना स्वबळावर लढवणार असल्याचे देखील पक्षाने स्पष्ट केले. तसेच आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाला द्यावी, यासाठी देखील पक्षांतर्गत चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान सेनेच्या या निर्णयावर भाजपकडून मात्र अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सेनेनी याअगोदर देखील अनेक वेळा स्वबळाची घोषणा केलेली आहे. परंतु यावर देखील भाजपने कधीही स्पष्टपणे आपले मत मांडलेले नाही. त्यामुळे सेनेच्या या घोषणेनंतर भाजपची भूमिका काय असेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@