रेल्वे बोगद्याची आ.भोळे यांनी केली पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

आयुक्तांना काम लवकर सुरू करण्याचे निर्देश

जळगाव :
शहराच्या प्रेमनगर येथील नव्याने निर्माणाधीन होत असलेल्या रेल्वे बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झालेले आहे. परंतु, या पावसाळ्यात नव्याने निर्माणाधीन असलेल्या बोगद्यात पूर्णतः पाणी साचत असल्याने हा बोगदा ६-७ फूट पाण्याखाली गेल्याने अनेक दिवसांपासून बंदावस्थेत आहे. या मार्गाने शहरात येणार्‍या हजारो नागरिकांची मोठी गैरसोय होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्यक्ष बोगद्यास्थळी शहराचे आ. सुरेश भोळे यांनी आयुक्तांसह भेट देऊन पाहणी केली.
 
 
मनपा आयुक्तांना हा बोगदा लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांचे होत असलेले हाल थांबविण्यासाठी तत्परता दाखविण्याची गरज आहे. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे आ. भोळे यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@