एन.टी.रामारावपुत्र नंदमुरी हरिकृष्ण यांचे अपघातात निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |



हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचे सुपुत्र आणि तेलुग देशम पक्षाचे लोकप्रिय नेते नंदमुरी हरिकृष्ण यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले आहे. तेलंगणा राज्यातील नालगोंडा या जिल्ह्यामध्ये हा अपघात झाला आहे. हरिकृष्ण हे तेलगु चित्रपट अभिनेते एनटीआर ज्युनिअर यांचे वडील असून टीडीपी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने सध्या दक्षिण भारतामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.


आज सकाळी हरिकृष्ण हे नाल्लोरहून हैदराबादकडे जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी ते स्वतःच आपली गाडी चालवत होते. यावेळी अचानक गाडीला अपघात झाला. गाडीच्या स्थितीवरून गाडी अनेक वेळा रस्तावर उलटून पडल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे गाडीवरील ताबा सुटल्यामुळेच अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी हरिकृष्ण यांना तातडीने जवळील कामिनेनी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.





हरिकृष्ण हे तेलगु चित्रपटसृष्टी आणि राजकारणामध्ये अत्यंत गाजलेली व्यक्तीमत्व होते. त्यांचे दिवंगत वडील एन.टी. रामाराव हे टीडीपी पक्षाचे संस्थापक तसेच आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. हरिकृष्ण यांनी आपल्या प्रारंभिक काळामध्ये अनेक तेलगु चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ते राजकारणाकडे वळले. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र ज्युनिअर एनटीआर हे चित्रपटसृष्टीमध्ये सक्रीय आहेत. तसेच हरिकृष्ण यांच्या एक भगिनी या आंध्रप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे एक मोठे व्यक्तिमत्वाच्या अशा अचानक जाण्याने तेलंगणा आणि आंध्रप्रदेशवर सध्या शोककळा पसरली आहे.
@@AUTHORINFO_V1@@