धुळे महापालिकेत यश निश्‍चितच मिळवू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा ठाम विश्‍वास

 
 
जामनेर :
पक्षाने धुळे महानगरपालिकेची जबाबदारी सोपविली असून त्याठिकाणीदेखील यश निश्चित मिळेल, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आ. आबाजी पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी झालेल्या कार्यक्रमात ना.महाजन बोलत होते.
 
 
ते पुढे म्हणाले की, राज्याचा मंत्री असलो तरी मंत्र्यासारखा बडेजावपणा आवडत नाही. रस्त्यावर झालेला अपघात पाहून त्यांना मदत केल्याशिवाय राहवत नाही. सेवाधर्म हाच माझा स्थायीभाव आहे. माझ्यावर या शाळेचे संस्कार झाले. राजकारणाचे धडे महाविद्यालयीन जीवनात येथूनच मिळाले. आबाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या आवारात कधीही राजकारण केले नसल्याचे ना. महाजन म्हणाले.
 
 
ना. महाजन यांनी आबाजी पाटील यांचा व नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सौ. पाटील यांचा सत्कार केला. व्यासपीठावर संस्थेचे माजी सचिव नारायण महाजन होते. प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भास्कर व शाळेचे पर्यवेक्षक व्ही. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कला, वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी रुबेला लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भास्कर, संचालक दिलीप महाजन, संचालक बाबुराव पाटील, दिलीप महाजन, जितेंद्र पाटील, दीपक पाटील, विजय पाटील, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. सुधीर साठे यांनी केले. आभार मुख्याध्यापक बी.आर.चौधरी यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@