शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात राहता पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करत शिर्डीच्या मतदारयादीत बेकायदेशीरपणे हे नाव नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, दि. १ जानेवारी २०१८ रोजी सदरचा प्रकार घडला आहे. इरो-नेट या ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करत साईबाबाचे नाव मतदार यादीत नोंदविण्यात आले आहे. नायब तहसीलदार एस एच म्हस्के यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. नमुना क्रमांक ६ या अर्जातील भरत मतदार (ठिकाणाचे नाव) यादीत साईबाबांचं नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्या समवेत निवासाचा पत्ता म्हणुन साईमंदिराचा पत्ताही देण्यात आला होता.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/