डॉ. किसन महाराज साखरे यांना ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |




मुंबई : राज्य सरकारच्यावतीने संत साहित्यासाठी मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१७ -१८ सालाचाज्ञानोबा तुकारामपुरस्कारहा डॉ. किसन महाराज साखरे यांना येत्या दि. ३१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृह, पद्मावती चौक, पुणे येथे सायंकाळी साडेसहा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणार्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षीज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती.

 

पुरस्कार समारंभास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, अन्न नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा गिरीष बापट, सामाजिक न्याय विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून गेली ५७ वर्षापासून अनेक वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाड्.मयावर लेखन करीत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@