वरणगावच्या नागेश्‍वर महादेव मंदिरास ४०० वर्षांचा वारसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

श्रावण महिन्यातील सोमवारी दर्शनासाठी होते भाविकांची गर्दी

 
वरणगाव :
नागेश्वर महादेव मंदिर चारशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. या पुरातन मंदिराचा व परिसराचा कायापालट होत असून ते भाविकांचे श्रद्धास्थान झाले आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी याठिकाणी येऊन भक्त महादेवाचे दर्शन घेत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
 
 
भाविकांना शिस्तीत दर्शन घेता यावे म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भुसावळ तालुक्यातून तसेच दूरवरून हजारोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. श्रावण सोमवारी तर दर्शनासाठी तासन्तास उभे राहावे लागते. नागेश्वर महादेवाच्या दर्शनाने भाविकांची मनोकामना पूर्ण होते, असा या परिसरातील भाविकांचा विश्वास आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता, पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था असल्याने दरवर्षी सुमारे २००पेक्षा जास्त विवाह येथे होतात. सहलीसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. प्राचीन काळाच्या पाऊलखुणा जपणार्‍या वरणगावचे नागेश्वर मंदिर श्रद्धेचे प्रतीक आहे. दरवर्षी यात्रेनिमित्त येथे श्रद्धाळू येत असतात. नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे चंद्रकांत बढे, भागवत पाटील, रमेश सरोदे, दिलीप झोपे, विलास पाटील आदी परिश्रम घेत आहे.
 
मंदिराची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी
इंदूरच्या होळकर राजांच्या व ग्वाल्हेरच्या शिंदे राजांच्या पुरातन नोंदी संस्थेकडे आहेत. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सन १९७९मध्ये ट्रस्ट तयार केली आहे. तेव्हापासून या मंदिराची सुधारणा करून परिसर निसर्गरम्य करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे त्रयोदश कल्केश्वर ज्योर्तिलिंग मंदिरसुद्धा आहे. या मंदिराचे मुख्य द्वार पूर्व दिशेला आहे. गाभार्‍यासमोर शिव-पार्वतीची मूर्ती असून गाभार्‍याच्या द्वाराजवळ गणपती व हनुमानाची मूर्ती आहे.
@@AUTHORINFO_V1@@