चाळीसगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या ३७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

आ.उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्याने २८ गावे होणार टंचाईमुक्त

 
 
चाळीसगाव :
तालुक्यातील ३७ कोटी १५ लाख किमतीच्या २८ पेयजल योजनांना मंजुरी देण्याबाबत तांत्रिक छाननी समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून या योजनांना मंजुरी मिळून २८ गावांचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटेल, अशी माहिती आ. उन्मेश पाटील यांनी दिली.
 
 
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत तांत्रिक छाननी समितीची बैठक पाणीपुरवठा सभागृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी छाननी समितीच्या बैठकीत कृती आराखड्यात समावेश झालेल्या समितीपुढे तांत्रिक छाननी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९च्या कृती आराखड्यामध्ये नव्याने समावेश केलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना अटी शर्थीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील २० गावांच्या योजनांचा समावेश आहे.
 
 
तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा सदर योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनांच्या मंजुरीसाठी आ. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
 
 
त्यानुषंगाने नाशिक प्रादेशिक विभागातील ५ जिल्ह्यांसाठी अप्पर मुख्य सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक मुंबईला झाली. दरम्यान, पाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.
 
 
चाळीसगाव तालुक्यातील समावेशित गावे व निधी
आडगाव ९० लक्ष, चांभार्डी खु. १०० लक्ष
शिंदी - चतुर्भुज १९० लक्ष, शिंदी जूनपाणी सेटलमेंट ५० लक्ष
चिंचगव्हाण, सुंदरनगर १९० लक्ष, चितेगाव १०० लक्ष,
देशमुखवाडी १५० लक्ष, हिंगोणे खु. १३० लक्ष, हिरापूर १४० लक्ष
मेहुणबारे ३०० लक्ष, ओढरे विष्णूनगर १०० लक्ष
पिंप्री खु. परशुरामनगर १५० लक्ष, पिंपरखेड - १९० लक्ष
पिंप्री बु.प्र.चा .- १५० लक्ष, रोकडे वाघारी - १५० लक्ष
माळशेवगे शेवरी - ५० लक्ष, सांगवी - १६० लक्ष
तमगव्हाण -१०० लक्ष, टेकवाडे बु. - ५० लक्ष
टेकवाडे खु. -५० लक्ष, वाकडी -१५० लक्ष
खडकी बु. पाटखडकी -१९० लक्ष, बहाळ -१९० लक्ष
भवाळी -१०० लक्ष, शिरसगाव- १५० लक्ष
पातोंडा -१९० लक्ष, पिंपळवाड म्हाळसा-७५ लक्ष, देवळी -८० लक्ष
@@AUTHORINFO_V1@@