‘आश्रय-माझे घर’ मधील मुलं आनंदली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |

रक्षाबंधन उत्सवात पालक, विविध संस्था प्रतिनिधींचा सहभाग

 
जळगाव : 
केशव स्मृती सेवासंस्था समूह संचलित आश्रय माझे घर या प्रकल्पात रक्षाबंधन उत्सव रविवारी अनोख्या उत्साहात पार पडला. गर्दी व भेटवस्तू, कौतुकभरल्या आणि प्रेममय नजरेने बांधलेल्या राख्या यामुळे ही मुलं साहजिकच आनंदून गेली होती.
 
 
अनेक विद्यार्थ्यांचे पालक, आप्त आणि पु.न.गाडगीळ अँड सन्स या विख्यात सराफी फर्ममधील अधिकारी व सहकारी तसेच निस्वार्थ सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, तसेच अन्य काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परिसर गजबजून गेला होता. नजिकच्या ङ्गमातोश्री आनंदाश्रमातही अनेकांनी जात आजी-आजोबांशी संवाद केला, त्यांच्यासोबतही रक्षाबंधन केले.
 
 
‘आश्रय’चे प्रकल्प प्रमुख अमेय पाठक, उपप्रमुख रेखा पाटील, सहसचिव ललित नेमाडे यांच्यासह संचालक, आश्रयमधील सहाय्यक, मदतनीस सहभागी झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@