समस्यांसाठी मुख्यालयासमोर उपोषणे आणि ठिय्या आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |


 

उल्हासनगर: उल्हासनगर शहरात विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून विविध मागण्यांसाठी पालिका मुख्यालयासमोर तीन सामाजिक संघटनांनी उपोषण सुरू केले आहे तसेच पाणी टंचाईच्या विरोधात महिलांनी मुख्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले.
 

उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कालपासून आमरण उपोषण सुरू केले आहे .मातंग संघर्ष समितीने नादुरुस्त शौचालये , मोडकळीस आलेले समाजमंदिर यांची दुरुस्ती करण्यासाठी केलेली प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.वाल्मिकी संघटनेचा शहर अध्यक्ष संतोष वाल्मिकी आणि त्यांचे सहकारी देखील उपोषणाला बसले असून महानगरपालिका शाळा क्रमांक २१ ला पोषण आहार पुरविणाऱ्या अस्मिता महिला मंडळ चा कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे . काही दिवसांपूर्वी मुलांच्या आहारात लेंडी आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती . या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत अस्मिता महिला मंडळाचा कंत्राट रद्द केल्याची प्रक्रिया सुरू केली आहे . तर जेवणात लेंडी आढळणे हे संशयास्पद असून एका राजकीय षडयंत्राद्वारेच का कंत्राट रद्द केला असा आरोप अस्मिता महिला मंडळतर्फे दिलीप मालवणकर यांनी केला आहे .

 

तिसरीकडे शहरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात एक सामाजिक संघटना उपोषण सुरू केले आहे . उल्हासनगर - ५ येथील लालचक्की परीसरातील रमाबाई आंबेडकर टेकडी भागात तीव्र पाणी टंचाईच्या विरोधात महिलांनी उत्स्फूर्तपणे मुख्यालय समोरच आज सकाळी ठिय्या आंदोलन केले . गेल्या दीड वर्षांपासून येथील २ हजार रहिवासी पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेले आहेत . या बाबत त्यांनी पाणीपुरवठा अभियंता कलई सेलवन यांना जाब विचारला असता पाईप लाईन बसविण्याचा ३ लाख १९ हजाराचा कंत्राट ए . एम रामचंदानी या कंपनीला दिला आहे हे काम अपूर्ण असून येत्या २० दिवसात आम्ही समस्या दूर करू असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले आहे.सदर उपोषणे आणि आंदोलन हे सामाजिक संघटनांनी केले असून राजकीय पक्षांना बाजूला सावरून केली आहेत. या उपोषण आणि आंदोलनामुळे मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@