गटारावरील झाकण हटवणे हा गंभीर गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |


 

पालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई : गटारावरील झाकण उघडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सोमवारी मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात बॉम्बे रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेवर मॅनहोलच्या सुरक्षेवरून टीका झाली. त्यामुळे पावसाळ्यात कुणीही मॅनहोल उघडू नये, म्हणून महापालिकेने संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

 

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी एलफिन्स्टन रोड स्थानकाजवळ मॅनहोल खुले करून ठेवले होते. या मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह वरळी समुदात आढळला होता. त्यानंतर ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स’ या सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शहरातील सर्व उघडी गटारे संरक्षक जाळ्यांनी बंद करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्याची विनंती केली होती. यावर झालेल्या सुनावणीत महापालिकेने न्यायालयाला ही माहिती दिली.

 

न्यायालयाला माहिती देताना महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे म्हणाले, ‘मुंबईत पाणी साचणार्‍या ठिकाणी ८३९ गटारे आहेत. या सर्व गटारांवर संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत. या गटारांवरील झाकण काढणे यापुढे गुन्हा ठरेल.’

 

‘उघड्या गटारांची सूचना द्या’

कोणत्याही कारणासाठी गटारे उघडी केलीत, तर उघड्या गटारांजवळ लाल झेंडा किंवा सूचना फलक लावा. पावसाळ्यापूर्वी गटारांच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम पूर्ण करत जा. त्याशिवाय उघड्या गटारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा,’ अशी सूचना उच्च न्यायालयाने महापालिकेला केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@