केशवस्मृती प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी भरत अमळकर आणि सचिवपदी रत्नाकर पाटील यांची फेरनियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |

जळगाव, २८ ऑगस्ट
केशवस्मृती प्रतिष्ठानची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली आहे. सभेत केशवस्मृती प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि संचालक मंडळ उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वाढत्या सेवाभावी कार्यासह पुढील ३ वर्षाच्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी जळगावमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक भरत अमळकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर पाटील आणि उपाध्यक्षपदी माजी शिक्षणाधिकारी तथा डाएटचे माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड आणि जळगावमधील प्रसिद्ध रक्ततज्ञ डॉ.विवेकानंद कुलकर्णी यांची, कोषाध्यक्ष म्हणून गोपाल दालमिलचे संचालक प्रेम कोगटा, सहसचिव डॉ. रवी हिराणी तर सदस्य म्हणून संजय बिर्ला, दीपक जोशी, मनीषा खडके आणि सिद्धार्थ बाफना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रकल्प प्रमुखांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत. माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या प्रकल्प प्रमुखपदी डॉ.नितीन चौधरी तर सहप्रकल्प प्रमुख म्हणून शरद कोत्तावार हे असतील. मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या प्रकल्प प्रमुखपदी सचिन चोरडिया तर सहप्रकल्प प्रमुख म्हणून डॉ.धर्मेंद्र पाटील यांची नियुक्ती केली आहे. मातोश्री आनंदाश्रमच्या प्रकल्प प्रमुखपदी अनिता कांकरिया, सहप्रकल्प प्रमुख म्हणून संजय काळे यांची नियुक्ती केली आहे. सेवावस्ती विभागाचे प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ.विवेक जोशी तर समतोल प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुखपदी दिलीप चोपडा यांची नियुक्ती झाली आहे.

आगामी तीन वर्षाच्या काळात समाजातील गरजूंसाठी काम करण्याचा व प्रतिष्ठानच्या सहयोगाने चालणारे प्रकल्प अधिकाधिक लोकाभिमुख करून ते प्रकल्प लोकचळवळ होतील या दिशेने वाटचाल करण्याचा मनोदय कार्यकारणीने व्यक्त केला आहे.


@@AUTHORINFO_V1@@