मोदी-शाह घेणार भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह हे आज नवी दिल्ली येथे देशातील सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहे. गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र सरकारने सुरु केलेल्या विविध योजना आणि त्यांची प्रत्येक राज्यांमध्ये झालेली अंमलबजावणी याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.


विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये केंद्र नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रत्येक राज्यनिहाय निवडणुकीसाठी वेगवेगळी रणनीती बनवण्याकडे भाजपचा कल आहे. त्यामुळे भाजपशासित प्रत्येक राज्यातील प्रतिनिधींना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण १५ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उर्वरित राज्यांचे भाजप प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विरोधकांसह आता सत्ताधारी पक्ष देखील निवडणुकांच्या तयारीमध्ये लागल्याचे दिसून येत आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजपच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@