ओझरखेडा जलसिंचनामुळे शेतकर्‍यांना नवसंजीवनी : आ.खडसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |

काहुरखेडा पाझर तलावात केले जलपूजन

 
वरणगाव :
हतनूर धरणातून लाखो लिटर पाणी वाहून जात होते. परंतु, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन प्रकल्पामुळे परिसराला संजीवनी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे धरणातून वाहून जाणारे पाणी ओझरखेडा येथील धरणात सोडण्यात येणार असल्याने ओझरखेडा परिसरातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. दरम्यान, काहुरखेडा तालुका भुसावळ येथे असलेला पाझर तलाव अनेक वर्षांपासून कोरडा होता. या तलावामध्ये पाणी सोडल्याने परिसराला संजीवनी मिळणार असून साडेतीनशे एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे माजी मंत्री आ. एकनाराव खडसे म्हणाले. काहुरखेडा येथे पाझर तलावातील पाण्याचे जलपूजनप्रसंगी ते बोलत होते.
 
 
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, राजेंद्र चौधरी, सभापती निवृत्ती पाटील, माजी उपसभापती गोलू पाटील, सरपंच जयश्री वराडे, उपसरपंच अरुण वराडे, दिलीप वराडे, पं.स. सदस्य विकास पाटील, सरपंच वैशाली टाकोळे, उपसरपंच राजकुमार चौधरी, आय. व्ही.आर. कंपनीचे निलेश भोसले, पाटबंधारे विभागाचे अभियंता चिनावलकर आदी मान्यवरांचा काहुरखेडा व मानपूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@