थराबाबत गोविंदापथके संभ्रमवस्थेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |



डोंबिवली : गोपाळकाला सण नजीक येऊन ठेपला असताना गोविंदा पथकाकडून रचल्या जाणाऱ्या थरांबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट केल्याने थरांबाबत संभ्रमवस्था कायम राहिली आहे . ऐनवेळी नियम आणि अटी लादल्या जात असल्याने दहीहंडी या साहसी खेळास कुठेतरी मुरड घातली आत असल्याची खंत डोंबवलीतील अष्टविनायक गोविंदा पथकाचे सर्वेसर्वा कल्याण डोंबिवली महापालिकेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी व्यक्त केली आहे. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या मातीतला हा गोपाळकाला उत्सव जगभरात पोहचला .एक वर एक रचल्या जाणाऱ्या मानवी थराची गगनचुम्बि भरारी ची नोंद गिनीज बुकात घेण्यात आली आहे. मात्र हा साहसी खेळ बंधनात कुठे तरी लोप पावत आहे की काय अशी भीती व्यक्त होताना दिसते . दहीहंडी फोडताना मानवी थरावर कोसळून काही अपघात होतात तर मृत्यू होतात हि वस्तुस्थिती असली तरी काही अन्य खेळप्रकारातहि जायबंदी तसेच मृत्यूहि होण्याच्या घटना या घडत आहेत एकमेव अशा दहीहंडी सारख्या साहसी खेळाला मर्यादा का असा सवाल केला आहे?

 

या खेळाकडे एक प्रोत्साहन एक साहसी खेळ म्हणून पाहावे अशी मागणी केली .एन वेळी लादल्या जाणाऱ्या जाचक अटीमुळे पुरता भ्रमनिरास होत असल्याने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .शासनाच्या नियमावलीत राहुन सण साजरा करण्यास आम्हाला हरकत नाही पण या बाबतीत एखादा निर्णय आपल्या परंपरेस अनुकूल राहून या अटी असाव्या अशी आशा मंडळांनी व्यक्त केली आहे

 

मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली गोविंदाला १८ वर्ष वयाची अट घातली होती तसेच दहीहंडीची उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी यावर निर्बंध घातले होते. तर मुंबई पोलीस कायदा १४३ () मध्ये सुधारणा करा असे सुचित केले होते. त्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत ही याचिका फेटाळली होती. याकडे लक्ष वेधले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे १८ वर्ष वयाची अट शिथिल होऊन १२ वर्षांपर्यंतच्या गोविंदा पथकात सहभागी होता यावे तसेच २० फूट उंचीची मर्यादा ही ठेवण्यात येऊ नये अशी मागणी करत नागरिकांना आवाजाचा, वाहतुकीचा त्रास होणार नाही गोविंद पथकासाठी सुरक्षेच्या सर्व उपाय योजना करुन या वर्षी परवानग्या देण्यात याव्या गोविंदाच्या सुरक्षिते साठी नवनवीन योजना काढण्यात याव्या पण आपल्या या सणाच्या खेळाची नोंद घेऊन जर स्पेन सारख्या देशात १०ते१२ थर रचण्यात येतात तर आपल्या पारंपरिक खेळाला थराची अट का असा मंडळांच्या वतीने उपस्थित केला जात आहे दरम्यान गेल्या दीड महिन्या पासून प्रॅक्टिसला सुरुवात झाली आहे . यात कल्याण डोंबिवलीतील नावाजलेल्या मंडळांनी सुमारे ७ते थराच्या दहीहंडी ची प्रॅक्टिस सुरू केली आहे तर नव्याने निर्माण होणाऱ्या मंडळानी सुमारे थराची दहीहंडी थराची प्रॅक्टिस केली आहे .

 

दहीकाला साठी बाजार ही सज्ज

पुढील आठवड्यात सप्टेंबर रोजी दहीकाला असून यासाठी बाजार ही सजू लागला आहे .गोकुळाष्टमी लागणारे साहित्यही बाजारात दाखल झाले आहे . रंगित दहीहंड्या ,कृष्णमूर्ती , पाळणी असे साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे . तसेच शाळांमध्ये या दिवशी घेण्यात येणाऱ्या वेशभूषा स्पर्धे साठी कृष्णपोशाख ही दाखल झाले आहेत

 

गोविंदाची वाट ही खड्ड्यातूनच

खड्डयांचा त्रास हा डोंबिवलीतील नागरिकांसाठी नवीन विषय नाही . गेल्यावर्षी दहीहंडी च्या निमीत्ताने या खड्यात पडून गोविंदानाही दुखापत झाली आहे. दहीहंडीचे उंच उंच थर लावून गोविंदा पडून जखमी होतात.मात्र डोंबिवली मधील गौरव राजभर हा १७ वर्षीय गोविंदा आजदे गावातून दुचाकी वरून जाताना रस्त्यांवर पडलेल्या खड्यात त्याची दुचाकी लआ आदळून राजभर खाली पडला.यात त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती . यंदा शहरात खड्याचे प्रमाण अधिक असल्याने असा एखादा अपघात अपेक्षित आहे

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@