महापालिकेतील बडतर्फ कर्मचार्‍यांना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |

बाजू मांडण्याची संधी मिळणार, भाजपाकडून शिष्टाई

 
 
जळगाव :
मनपाने बडतर्फ केलेल्या ७९ कर्मचार्‍यांची बाजू नैसर्गिक न्याय तत्वानुसार ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. या कर्मचार्‍यांना येत्या आठ ते १० दिवसात मनपाने स्थापन केलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडता येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
 
 
अग्निशमन विभागातील बडतर्फ कर्मचारी वाल्मीक सपकाळे यांनी आत्महत्या केल्यानंतर अन्य बडतर्फ कर्मचार्‍यांचा विषय ऐरणीवर आला असून, सोमवारी आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेतली. माजी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे आदी उपस्थित होते.
 
 
आ. भोळे यांनी बडतर्फ कर्मचार्‍यांची बाजू मनपा प्रशासनाने ऐकून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आयुक्त चंद्रकांत डांगे म्हणाले की, जून महिन्यात बडतर्फ कर्मचार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार होते, पण निवडणुकीमुळे ते शक्य झाले नाही. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीसमोर या कर्मचार्‍यांना आपली बाजू मांडता येईल. समितीत कार्यालय अधीक्षक, मुख्य लेखा अधिकारी व अस्थापना अधीक्षक यांचा समावेश आहे.
 
 
समितीने बडतर्फ कर्मचार्‍यांना नोटीस पाठवून कागदपत्रे व बडतर्फीच्या कारणांसह समिती समोर हजर होण्याची सूचना केली आहे. दररोज २० कर्मचार्‍यांची सुनावणी होणार आहे. बडतर्फीच्या कारणानुसार दंड किंवा कारवाई निश्चित केली जाईल पण कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@