ऑफिसमधील आरोग्यमंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |

 

 
 
ऑफिसमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्याल?

. शक्य तितका लिफ्टच्या ऐवजी जिन्यांचा वापर करा. 

. तुम्ही जर एकाच जागेवर तासनतास बसून काम करत असाल, तर अधूनमधून जागेवरून उठायला हवे. कामाच्या दरम्यान थोडा ब्रेक घ्या.

. या ब्रेक दरम्यान संपूर्ण ऑफिसमध्ये किमान एक फेरफटका मारा. त्यानिमित्ताने थोडे चालणे होईल.

. दिवसभर संगणकावर काम करताना डोळ्यांचे विकार उद्भवू नयेत, म्हणून संगणकाच्या स्क्रीनचा ब्राईटनेस सेट करून ठेवा. तसेच संगणकाचा स्क्रीन तुमच्या डोक्याच्या उंचीला अगदी समोर राहील, अशी व्यवस्था करा. जेणेकरून तुम्हाला काम करताना खाली किंवा वर पाहावे लागणार नाही. त्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही. तसेच मान व खांदे दुखणार नाहीत.

. संगणकावर काम करताना अधूनमधून नजर दुसरीकडेही वळवत जा. जेणेकरून डोळे दुखणार नाहीत. तसेच दिवसातून दोन-तीन वेळा तरी डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा.

. तुम्हाला चष्मा असेल, तर संगणकावर काम करताना तो जरुर वापरा. त्यामुळे चष्म्याचा नंबर वाढणार नाही व डोळ्यांचे आरोग्यही सुधारेल.

. एकाच ठिकाणी जर तुम्हाला बराचवेळ बसून काम करावे लागणार असेल, तर ताठ बसा. तसेच अधूनमधून पाठ खुर्चीला मागे टेकवा. खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे आणि शरीराची ठेवण नीट न राहिल्यामुळे पाठदुखीसारखे आजार सतावतात.

. काम करताना पायासह पायाच्या बोटांचीही हालचाल करत राहा. त्यामुळे पायाला मुंग्या येणार नाहीत व सांधेदुखी बळावणार नाही.

. ऑफिसमध्ये डेस्कवर तुमच्या पुढ्यात पाण्याची बाटली ठेवत जा. थोड्या-थोड्या वेळाने किमान घोटभर पाणी प्या. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही व घशाला कोरड पडणार नाही. तसेच शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाईल.

१०. बसल्याजागी खुर्चीवर तुम्ही काही सोपे व्यायामप्रकारही करू शकता. त्यामुळे शरीराची हालचाल होत राहील.

 

ऑफिसमध्ये कामादरम्यान तुम्ही या गोष्टी कराच, पण त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी धावणे, दोरीउड्या मारणे, बागेत एखादा फेरफटका मारणे किंवा मग घरच्या घरी चालणे हा उत्तम व्यायाम आहे, असे म्हणतात. जवळच्या ठिकाणी जाताना बस, टॅक्सीने प्रवास करणे टाळा. त्याऐवजी चालत जा. कारण, चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होते.

 

बऱ्याचदा नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी पहाटेचा गजर स्मार्टफोनमध्ये लावला जातो. पण रात्री उशिरापर्यंत हाच स्मार्टफोन हातात असल्याने व्यवस्थित झोपही लागत नाही. मग धावतपळत ट्रेन पकडली जाते. या धावपळीदरम्यान शरीराला आलेला घाम अंगावरच सुकवला जातो. कारण बहुतांश ऑफिसमध्ये आजकाल एसी असतो. त्यामुळे नैसर्गिक हवा शरीराला मिळतच नाही, किंबहुना तिचा शरीराशी जास्त संपर्कच येत नाही. कित्येकजणांना तर एसीची सवय इतकी अंगवळणी पडलेली असते की, जिकडे जातील तिथे त्यांना एसीची गरज भासते. एसीशिवाय जणू ते राहूच शकत नाहीत. मग कधीतरी ही लोकं या नैसर्गिक हवेच्या संपर्कात आले की, त्यांना दरदरून घाम फुटतो. हा अशाप्रकारे अचानक दरदरून घाम फुटणे, हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- साईली भाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@