शहरी महिलांना संधीवाताचा सर्वाधिक धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |



 

संधीवाताचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असते, हे आता सर्वश्रुत वास्तव आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासांती असे लक्षात आले की, ‘ऑस्टिओ आर्थ्रायटिस’ म्हणजेच ‘संधीवात’ होण्याचे वय दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की, लवकरच हृदयरोग, कर्करोग किंवा एड्सच्या बरोबरीने ‘संधीवात’ हा आजारही तितक्याच मोठ्या प्रमाणावर बळावत आहे. येत्या काही वर्षात, तरुण महिलांमधील ‘ऑस्टिओ आर्थ्रायटिस’चे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब ठरणार आहे. मात्र, महिलांमध्ये ‘संधीवात’ अधिक प्रमाणात का होतो, याचे स्पष्ट कारण अद्याप पूर्णपणे कळू शकलेले नाही.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

जनुके, लठ्ठपणा, जीवनशैली, आहाराच्या सवयी, दुखापत आणि सांध्यांची ठेवण यांसारखी अनेक कारणे यात महत्त्वाची भूमिका बजावतात.पुराव्यांवरून असे दिसून येते की, शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा ‘ऑस्टिओ आर्थ्रायटिस’चे प्रमाण अधिक असून, यामुळेच तरुणांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. बदलत्या आहार सवयी, प्रदूषण आणि बेशिस्त जीवनशैलीचा अंगीकार यामुळे ‘ग्रामीण-शहरी’ असा हा भेद स्पष्टपणे दिसून येतो.

 
अयोग्य व चुकीचे व्यायाम, शरीराला ताण देण्याचा अभाव, दर्जा नसलेली पादत्राणे आणि दीर्घकाळ उंच टाचांच्या चपलांचा वापर यामुळे सांध्यांना दुखापत किंवा कमी वयात ‘संधीवात’ होतो. लठ्ठपणाचे वाढते प्रमाण हेदेखील एक महत्त्वाचे कारण असू शकते. ‘संधीवात’ असलेल्या रुग्णांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ५४ टक्क्यांनी अधिक असते. ‘संधीवात’ होण्यासाठी जनुकीय घटक महत्त्वाचे ठरत असले, तरीही त्यावर काही ठोस उपाय अद्याप मिळालेले नाहीत. विशेषत: तरुण महिलांमध्ये होणार्‍या ‘संधीवाता’साठी हे वरील घटक मुख्यत: जबाबदार ठरतात. साधारण ते गंभीर स्वरूपाचा ‘संधीवात’ असणार्‍या महिलांपैकी १५ टक्के महिला या ४५ वर्षांखालील आहेत.
 
 उपचार

रुग्णांच्या बदलत्या गरजांनुसार, अत्याधुनिक शस्त्रक्रियेचा पर्याय टार्गेटेड थेरपीच्या माध्यमातून चांगले, दीर्घकाळ उपाय पुरवू शकतो.

युनिकम्पार्टमेंटल नी रीसर्फेसिंग

यामुळे गुडघ्याचा बाधित भागच बदलला जातो. टोटल नी रिप्लेसमेंट (टीकेआर) म्हणजेच गुडघे प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत हे केले जात नाही. केवळ एका छोट्याशा छिद्राद्वारे ही शस्त्रक्रिया केली जात असून यातून रुग्ण त्वरित बाहेर पडतो व नियमित दैनंदिन कामे पार पाडू शकतो.

टोटल नी अॅण्ड हीप रिप्लेसमेंट

(गुडघे व नितंब प्रत्यारोपण)

ही शस्त्रक्रिया ऊतींच्या जतन पद्धतीने केली जाते. पारंपरिक तंत्रापासून भिन्न असलेल्या टिश्यू प्रीझर्व्हिंग टोटल नी रिप्लेसमेंट (टीपीटीकेआर) प्रक्रियेत आरोग्यपूर्ण हाड, लिगमेंट यांचे जतन करून ठेवले जाते व यात स्नायूंच्या ऊतींना कोणतीही इजा पोहोचवली जात नाही. त्वरीत रिकव्हरी होण्यावर भर दिला जात असून जतन केलेल्या ऊतींमुळे रुग्णाचे भविष्य यामुळे सुरक्षित राहते.

-डॉ. कौशल मल्हान 

(लेखक फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे वरिष्ठ गुडघे व हीप शल्यविशारद आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@