विदर्भात पावसाचा जोर वाढणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

विदर्भवासियांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा



नागपूर : येत्या २४ तासांमध्ये विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. आज आणि उद्या पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे नदी-नाले आणि ओढ्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भामध्ये मुख्यतः पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

दरम्यान या पावसामुळे विदर्भामध्ये पूरस्थितीनिर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्कत राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच २८ ऑगस्ट नंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@