आगामी निवडणुकांवर चर्चेसाठी पवारांनी बोलावली बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |


मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाची बैठक बोलावली आहे. मुंबईतील पक्ष कार्यलयामध्ये ही बैठक बोलावली असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदारसंघनिहाय आघाडी संबंधी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार हे स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार असल्यामुळे पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात आणि देशात पक्षीय आघाडीसंबंधी यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच आगमी निवडणुकांसाठीच्या उमेदवारी संबंधी देखील चर्चा होणार असल्याचे माहिती सध्या समोर येत आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पाच वर्षांचा कालावधी आता पूर्ण होत आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. त्यातच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे विरोधकांसमोर एक नवीन यक्षप्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आपल्या पक्षाला आणि कॉंग्रेसला सावरण्यासाठी पवार आज कोणता मंत्र आपल्या कार्यकर्त्यांना देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@