आशियाई क्रीडा स्पर्धेत सायना नेहवालला कांस्यपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |



जकार्ता : आशिया क्रीडा स्पर्धा २०१८ च्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या सायना नेहवाल हिला कांस्यपदक मिळाले आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये चीनच्या ताई त्झु यिंग हिच्याकडून २-० गुणांनी सायनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे यंदा तिला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे.

सामन्याचा पहिला सेट हा एकूण १९ मिनिटांचा खेळवला गेला होता. या पहिल्या सेटमध्ये यिंगने २१-१७ अशा गुणांनी सायनाचा पराभव केला. यानंतरच्या दुसऱ्या सेटमध्ये देखील २१-१४ अशा गुणांनी यिंगने सायनाचा सहज पराभव केला. यामुळे अंतिम सायनाला उपांत्य फेरीमधूनच परत फिरावे लागले. तसेच स्पर्धेतील कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले.


 
दरम्यान स्पर्धेमध्ये अद्याप भारतीय सुवर्णपदकाची अशा अजून जिवंत आहे. भारतीय रौप्य कन्या पी.व्ही.सिंधू ही सध्या महिला एकेरीच्या उपांत्यफेरीमध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळे सिंधूकडून सध्या संपूर्ण देशाला सुवर्णपदकाची आशा आहे. सिंधू समोर सध्या जपानच्या यामागुची हिचे आवाहन आहे.
@@AUTHORINFO_V1@@