आमचो कोळीवाडा आगीत भस्मसात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |



वसई - वसई पश्चिमेकडील स्टेला माणिकपूर परिसरात असलेल्या आमचो कोळीवाडा या हॉटेला आज दुपारी अचानक आग लागली. आग इतक्या प्रचंड प्रमाणात होती की, काही क्षणात आगीने भयंकर रूप धारण करत संपूर्ण हॉटेलवर ताबा मिळवला होता. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

 
 
 

या आगीत हॉटेलचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. आगीनंतर हॉटेलमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक माहितीनुसार शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@