भारताच्या सागरी क्षेत्रात व्यापार संधींना विस्तृत संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रचे संचालक
डॉ. साठेश शेणॉय यांचे प्रतिपादन

 
 
 
पुणे : “भारताला लाभलेल्या सागरी विस्तृत किनारा बघता आर्थिक क्षेत्रात विस्तृत काम करण्याची संधी म्हणून याकडे बघितले गेले पाहिजे. भारताला सागरी किनाऱ्यांसह अनेक बेटांचा मोठा वारसा आहे. सध्या आर्थिक बाबतीत भारत २.६ ट्रिलियन डॉलरसह जगभरात सहाव्या स्थानावर आहे. आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी मोठी आर्थिक सत्ता म्हणून तिसऱ्या स्थानावर भारताने झेप घ्यावी असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने सर्व प्रयत्न केले पाहिजेत.” असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रचे संचालक डॉ. साठेश सी. शेणॉय यांनी केले.
 
 
ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘सागर : भारताच्या सागरी क्षेत्रासमोरील आव्हाने व संधी’ या एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. मेरिटाइम रिसर्च सेंटरद्वारे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दिवसभरात विविध विषयांवर विचारविमर्श करण्यात आला.
 
दुपारी ब्ल्यू इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह या विषयावर भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रचे संचालक डॉ. साठेश सी. शेणॉय यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र पार पडले. ते यावेळी म्हणाले की, भारताला १.३ ट्रिलियन क्युबिक टन इतक्या मोठ्या प्रमाणात सॉलिटिफाइड गॅस (गॅस हायड्रेट्स) उपलब्ध आहे. यामधील पहिल्या टप्पा १० टक्केचा जरी धरला तरी भारत ऊर्जेच्या बाबतीत पुढील १०० वर्षे स्वयंपूर्ण होऊ शकेल.”
 
या सत्रामध्ये स्पेस अॅन्ड ओशिअन स्टडिज या मुंबई येथील संस्थेचे डॉ. सुखदेव गिरी, भारती विद्यापीठ पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. इराच भरुचा, पेट्रोफोसचे संचालक राकेश मेहरा, आयुकाचे संचालक सोमक रायचौधरी आणि हिंदुजा ग्रुपचे आर कन्नन यांनी सहभाग घेतला. त्यांनी भारताच्या सागरी क्षेत्रातील व्यापार क्षेत्रातील संधींविषयी विविध विषयांवर विचार मांडले.
 
@@AUTHORINFO_V1@@