"अखिल भारतीय कुलगुरू चषक टी-२०" स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाचा संघ काश्मीरला रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |
 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ ‘१६व्या अखिल भारतीय कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा २०१८’ मध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा १४ जणांचा चमू काश्मीरला गेला आहे. या स्पर्धेसाठी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी व इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. भारतभरातील विविध विद्यापीठांचे २० संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
 
ही स्पर्धा दि. २९ ऑगस्ट २०१८ पासून १३ सप्टेंबर २०१८ पर्यंत श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठ येथे होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाची निवड विद्यापीठाचे माजी क्रिकेटपटू नितीन सामल यांनी केली आहे. क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र शिक्षण मंडळाच्या डॉ. दीपक माने यांनी संघाला मार्गदर्शन केले आहे.
 
विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे -
 
१. मनीष गायकवाड (कर्णधार)
 
२. सुनील मते
 
३. दिपक गजरमल
 
४. संतोष सुगावे
 
५. नितीन प्रसाद
 
६. बसवंत गजलवार
 
७. विनोद नरके
 
८. सुनील कदम
 
९. बस्वराज भुरे
 
१०. समीर दिवे
 
११. सुशांत बुलबुले
 
१२. मंगेश कुडवे
 
१३. शंतनु काशीद
 
१४. संतोष माहुलकर
 
@@AUTHORINFO_V1@@