समाजहित जोपासत रक्षाबंधनाचा स्तुत्य उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |
 
 
जळगाव :
स्व.नवलबाई भिकमचंदजी बरडीया यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखी सत्कार्याची भावना मनात ठेवून, त्यांच्या आशीर्वादाने चोपडा शहरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि मूकबधिर विद्यालय येथे भेट देऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांच्यासाठी उपहाराचा कार्यक्रम आयोजित केला.
 
 
तसेच ह्या मंगलक्षणी स्वतःच्या मुलींकडून मूकबधिर मुलांना राखी बांधल्या. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा स्तुत्य उपक्रम साजरा केला. यापुढेही असे समाज हिताचे काम हातून घडण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी किरण चोपडा , शांतीलाल बरडिया, डॉ.प्रशांत चोपडा (कँन्सर तज्ज्ञ) व डॉ.प्रितम कवाड (एमडीएस) मिनाबाई कवाड, प्रिया संकलेचा, प्रितमा बोरा, कु काजल, खुशबु, पायल, प्रियका, पलक, कुशल, शुभम बरडिया, चंदु पाटील, शिरसाट, पाटील आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@