सिंधूने रचला आणखी एक इतिहास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

महिला एकेरीमध्ये पहिल्यांदाच भारतीय स्पर्धेकाची अंतिम सामन्यात धडक





जकार्ता : भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूने हिने आशिया क्रीडा स्पर्धा-२०१८ च्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक घेतली आहे. जपानच्या यामागुची अकाने हिचा २-१ अशा गुणांनी पराभव केला असून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला एकेरीच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय खेळाडूने धडक घेतली आहे. त्यामुळे सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी सध्या सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.


एकूण ६६ मिनिटे चाललेल्या या सामन्यामध्ये सिंधू आणि अकाने या दोघींमध्ये तीन सेट खेळवण्यात आले होते. यातील पहिल्या सेटमध्ये सिंधूने अकाने हिचा २१-१७ अशा गुणांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये अकाने हिने सिंधुवर मात करत १५-२१ ने दुसरा सेट आपल्या नावावर केला. परंतु यानंतरच्या तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने पुन्हा एकदा आपल्या दमदार खेळीचे प्रदर्शन करत अकाने हिच्यावर २१-१० अशा गुणांनी मात करत, अंतिम सामन्यात धडक घेतली.



दरम्यान आज सकाळीच भारताच्या सायना नेहवाल हिला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चीनच्या ताई त्झु यिंग हिने सायनाचा पराभव केला असून या पराभवामुळे सायनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये सिंधुकडून भारतीय नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, सिंधूने देखील या अपेक्षांचा मान राखत अंतिम सामन्यात धडक घेतली आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला एकेरीमधील रौप्य किंवा सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले जाणार हे आता नक्की झालेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@