लवकरच लागणार "नो हॉकर्स झोन "चे फलक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |



डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या फेरीवाला प्रश्न गहन बनत चालला आहे . १५० मीटर परीक्षेत्रात होणारे अतिक्रमण पाहता कारवाई कुचकामी ठरत आहे . मात्र आता रेल्वे स्थानक परिसरात लवकरच नो हॉकर्स झोन चे फलक झळकणार आहे . या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे . त्यामुळे आता हे फलक लावल्यावर तरी ठोस कारवाई होते का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे  मागील वर्षी एल्फिस्टन स्थानकात झालेल्या अपघाता नंतर सर्वच महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने जाहीर केला होता सुमारे १५० मीटर परिसर नो हॉकर्स झोन जाहीर करण्याचे आदेश हि देण्यात आले होते . मात्र या निर्णयाला कल्याण डोंबिवली महा पालिकेने केराची टोपली दाखवली . आजही डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे चित्र जैसे थे पहावयास मिळते

 

लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावा मुळे सातत्याने कारवाई करण्याचे सोंग केले जाते खरे पण त्याचा काही उपयोग नसल्याचे सातत्याने स्पष्ट होते . डोबिवली स्टेशन परिसर , तसेच स्काय वॉक येथे कायमच फेरीवाल्यांची दाटीचे चित्र दिसून येते . लोकप्रतिनिधीचा वाढता दबाव लक्षात घेत फेरीवाल्यानंकडून तात्पुरते सामान जप्त हि करण्यात येते . मात्र नंतर या सामानाचे काय होते हा विषय हि तितकाच गंभीर आहे .

 

फेरीवाल्याचे मते आम्हाला जागा देत नाही तो पर्यंत आम्ही स्टेशन परिसरातच वास्तव्य करणार अशी भूमिका ठाम करण्यात आली आहे . पण सतत च्या कारवाईमुळे त्रस्त झाल्याने त्यांनी हि वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे . पण ह्यावरच लवकरच तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे . कल्याण डोंबिवली महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उशिरा का होईना डोंबिवली स्टेशन परिसरात नो हॉक्सर्स झोन फलक लावण्याचे जाहीर केले आहे तसेच या नो हॉकर्स झोन परिक्षेत्रात थर्माप्लास्टिक पट्ट्याने मार्किंग करण्यात येणार आहे . या कामाला सुमारे रु १६लाख ,५७हजार ,६९५ रु इतका खर्च अपेक्षित आहे .  या नो हॉकर्स झोन क्षेत्रात बसणाऱ्या फेरीवाल्यावर कोणती करावाई होणार हे महापालिकेने जाहीर केले नसले तरी या बाबत नागरिकांना मात्र मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@