अमळनेरला दुर्धर आजाराच्या रूग्णांना वैद्यकीय मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

मुख्यमंत्री सहायता निधीतून ३ लाखाचे अर्थसहाय्य, आ.शिरीष चौधरी यांचा पाठपुरावा

 
जळगाव :
अमळनेर परिसरात दुर्धर आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे युसूफ जोयफभाई बोहरी रा अमळनेर यांना २ लाखाची तर रानुबाई चव्हाण रा. खेडी सिम ता.अमळनेर यांना एका लाखांची मदत मिळाली आहे. त्यामुळे रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
 
 
आमदार शिरीष चौधरी हे नेहमीच गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात देत असतात,आतापर्यंत त्यांच्या पाठपुराव्याने अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळून योग्य उपचार व जीवदान मिळाले आहे. या रूग्णांना आमदार चौधरी यांनी मंजुरीचे पत्र दिले. यावेळी कृ.उ.बा.समितीचे संचालक उदय नंदकिशोर पाटील, सुनील भामरे, डॉ रावसाहेब पाटील, सुरेंद्र पाटील, जयवंत पाटील, किरण चव्हाण, अहमद अहसान बुर्‍हानी, अब्दुल कादर हुसैन सहैफी उपस्थित होते. योग्यवेळी मदत मिळाल्याने बोहरी व चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी आ.चौधरी यांचे आभार मानले.
रूग्णांना दिलासा
युसूफ जोयफभाई बोहरी व रानुबाई चव्हाण या दुर्धर आजाराने त्रस्त असून त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने आ. चौधरी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी अशी शिफारस केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे युसूफ जोयफ बोहरी यांना दोन लाखाची तर रानुबाई चव्हाण यांना एक लाखांची मदत मिळाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@