चाळीसगावात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |
 
 
चाळीसगाव :
येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन, कोनशिलाचे आनावरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय गंगापुरवाला यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
 
बालगायिका स्नेहल सापनर हिने स्वागत गीत सादर केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संगीतराव पाटील, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गोविंदा सानप नवनियुक्त वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश लक्ष्मीकांत पाढेण, चाळीसगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविकातून राहुल पाटील यांनी येथील दिवाणी न्यायालयासाठी केलेल्या संघर्ष व योगदान याविषयी माहिती दिली. वकीलांनी चाळीसगावचा न्यायीक बुद्धिमत्ता व नावलौकिक उंचावला आहे, तो आदर कायम ठेवण्यासाठी नव्या पिढीच्या वकिलांनी मेहनतीसाठी प्रयत्नशील रहावे. जागेची उपलब्धता झाल्यास येत्या काळात राहिलेला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे काम मार्गी लागेल असा विश्वास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय गंगापुरवाला यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
चाळीसगाव कर्मभूमी असल्याने येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय सुरू व्हावे यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला. न्यायालय मंजुरीच्यासाठी मी व्यक्तिशः मंत्रालयात जाऊन प्रयत्न केले. मात्र तेथील अनुभव वेगळा ठरला. प्रत्येक वेळी दोष काढून फाईल अडकून पडायची मात्र तिला वेळोवेळी आमदार उन्मेष पाटील यांना धक्का द्यायला लावायचो मग ती पुढे सरकत होती. न्यायमूर्ती गंगापूरवाला व न्यायमुर्ती सोनवणे यांची मोठी मदत मंजुरीसाठी मिळाली असे सांगून न्यायमुर्ती संगीतराव पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
 
 
यावेळी आ. उन्मेष पाटील, कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सहसचिव राजेश जाधव, खजिनदार ज्योती धर्माणी, ऍड. प्रकाश पाटील जळगाव, आर आर महाजन जळगाव, अनिल पाटील, केतन ढाके, जळगांव, जिल्हा कर्मचारी संघटनेचे पी.जी.नगरकर, व्ही.जी.भालेराव, एस.डी.ठाकूर, श्याम परखडकर, सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर उपस्थित होते. चाळीसगाव न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनिता गिरडकर यांनी मराठी कविता, अभंग यांचे दाखले देत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. अतिरिक्त जिल्हान्यायाधीश पी. वाय.लाडेकर यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@