भाजपच्या आक्रमक भूमिकेपुढे शिवसेनेची माघार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

 

 

 

आदित्य ठाकरे यांचा पाहणी दौरा अर्ध्यावरच आटोपला

 

मुंबई चेंबूर येथील जनरल अरुणकुमार वैद्य तलावाच्या उद्धाटन कार्यक्रमाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला भाजपच्या आक्रमतेपूढे नमते घ्यावे लागले. अखेर उद्घाटन नाही, पाहणी दौरा असल्याची सारवासारव शिवसेनेला करावी लागली. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होते.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेंबूर येथील जनरल अरुणकुमार वैद्य तलावचे आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. शिवसेनेने उदघाटनाची तयारी केली होती. मात्र, भाजपला आदल्या दिवशी कार्यक्रमाची कुणकूण लागल्याने त्यांनी सकाळी १० वाजता उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेनेने एक पाऊल मागे घेत हे उदघाटनाचा कार्यक्रम पाहणी दौऱ्यावर आटोपण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, प्रकाश फातर्फेकर, नगरसेविका अंजली नाईक, समृद्धी काते, समीक्षा सक्रे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

काय आहे प्रकरण?

 

चेंबूर येथील जनरल अरुणकुमार वैद्य तलावचे उदघाटन गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. १८ ऑगस्ट रोजी त्याचे उदघाटन होणार होते. मात्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती.

 

 
 

तलावाचा इतिहास

 

पालिकेने १९९१-९२ जनरल अरुणकुमार वैद्य तलाव बांधला होता. तलावाला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला परंतु देखभाल आणि दुर्लक्षामुळे तलावाची दुरवस्था झाली. त्यामुळे २००७ पासून हा तलाव पालिकेने पोहण्यासाठी बंद केला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी आंदोलन केले. त्यानंतर तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर तत्कालीन प्रभाग समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर १८ मार्च २०१५ पासून ऑलंम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव बांधण्याच्या कामास सुरवात झाली. जवळपास साडेतीन वर्षांनंतर हे काम पूर्ण झाले परंतु उद्धघाटनाला दिरंगाई केली जात होती. त्यामुळे स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्याची घोषणा पालिकेने केली होती.

 

कार्यक्रमाविषयी राजकीय पदाधिकाऱ्यांच म्हणणं काय?

 

आज चेंबूर येथे मुंबई महानगर पालिकेच्या जनरल अरुण कुमार वैद्य स्विमिंग पूलाची पाहणी केली. मुंबईत जलतरण तलाव आणि क्रीडासंकुलाची गरज आहे. ज्यांना येथे येऊन पोहायचे आहे त्यांना पोहू दे मी राजकारणात जाणार नाही. मी राजकीय पाण्यात उडी मारणार नाही कारण तिथे चिखल असतो.

- आदित्य ठाकरे

शिवसेना नेते

 

चेंबूरमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या जनरल अरुण कुमार वैद्य स्विमिंग पूलाच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. तलाव परिसरात भगवे झेंडे आणि भगवे फुगे लावण्यात आले होते. तसेच बॅनरबाजी करण्यात आली होती. परंतु हा उदघाटनाचा कार्यक्रम नव्हता तर पाहणी दौऱ्याचा कार्यक्रम होता. बॅनरमध्ये उदघाटन करण्याचा उल्लेख आम्ही केलेला नाही.

- प्रकाश फातर्पेकर

शिवसेना आमदार

 

शिवसेना श्रेयवादाची लढाई लढत नाही.अटलजींच्या निधनानंतर आम्ही उदघाटन कार्यक्रम घेतले नाही परंतु रस्ते, जलतरण तलाव खुले केले. महापौर म्हणून मी येथे पाहणीसाठी आलो स्थानिक नरसेविका आशा मराठे यांनीही यायला हवे होते.

- विश्वनाथ महाडेश्वर

महापौर

 

जनरल अरुणकुमार वैद्य तलावसाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. पालिकेचा काही कार्यक्रम असेल तर स्थानिक नगरसेवकाला बोलविण्यात येते. परंतु उदघाटन कार्यक्रमाबाबत त्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. तरीही चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर आणि माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर यांनी कार्यक्रमाची तयारी केली. प्रभाग क्र १५२ मध्ये कोणतेही विकास कामे केल्यास चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर आणि माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. फातर्पेकर कुटुंब नगरसेवक मानसिकतेतून आजही बाहेर आले नाहीत. स्वतःला नगरसेवक म्हणवून घेत आहेत. आताही बॅनर लावण्यात आले तसेच तलाव परिसरात फुगे, भगवे झेंडे लावण्यात आले होते. स्थानिक नगरसेविकेला डावलून माजी नगरसेविकेला श्रेय देण्याचा शिवसेनाचा प्रयत्न होता. परंतु भाजपनेही उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन केल्याने शिवसेनेला नमते घ्यावे लागले.

- आशा मराठे

नगरसेविका प्रभाग क्र १५२

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@