भुसावळला कर्म क्षय केलेल्या तपस्वींची सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |
 
भुसावळ :
राष्ट्र प्रवर्तीनी डॉ.श्री.ज्ञानप्रभाजी यांच्या सान्निध्यात भव्य तप महोत्सवात मोठ्या तपश्चर्येने कर्म क्षय केलेल्या तपस्वीची सांगता भुसावळ शहरात २६ रोजी आयोजित करण्यात आली होती. याअंतर्गत प्रसिध्द उद्योगपती स्व.शांतीलाल सुराणा यांचे नातू हितेश जयंतीलाल सुराणा याने युवा अवस्थेत तपाचे शिखर गाठल्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
 
 
भुसावळ शहराचे प्रसिध्द उद्योगपती स्व.शांतीलाल सुराणा यांचे नातु जयंतीलाल सुराणा यांचे चिरंजीव हितेश यांनी तब्बल ३१ दिवसाचे कठोर उपवास केले आहेत. हितेश यांनी युवा अवस्थेत हे कडक तप केले आहे. यासोबत रमेश कोठारी यांच्या सून मंजूबाई अजितकुमार कोठारी यांनी ३१ दिवसांचे कठोर उपवास केले आहेत.
 
 
या चातुर्मासात या साधकांना ९ साध्वींचे मार्गदर्शन तथा सतप्रेरणा मिळाली. साध्वींच्या संत्संगाने अनेकांनी ३१,१५,११,०९ असे उपवास केले. समकित नितीनकुमार सुराणा याने सुध्दा व्यस्तेत असूनही १५ दिवसांचे उपवास केले. उपवासांची सांगता रविवार, २६ रोजी भव्य वरगुडा मिरवणूक वाजत-गाजत अष्टभुजा मंदिरापासून संतोषी माता सभागृहापर्यंत काढण्यात आली.
 
 
वरगुडा मिरवणुकीला अनेकांची उपस्थिती
अफाट गर्दीत जैन श्रावक संघ-तेरापंथ सभेला लाभले आतिथ्य. दुपारी विशेष गीत गायनात भक्ति संगीताच्या कार्यक्रमात सुध्दा ५०० महिलांची उपस्थित होत्या. जेथे सकाळी वरगुडा मिरवणुकीत १२०० लोकांनी हजेरी लावली होती. सत्संग एवं सांगता कार्यक्रमात २ हजार लोकांनी आपले आशीर्वाद प्रदान केले.
@@AUTHORINFO_V1@@