प्रतिकूल परिस्थितीतही समाजाच्या सहकार्याने गोवंशाचे संवर्धन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

धुळ्यातील मेहेंदळे शिवारातील डॉ.के.एम.दुगल स्मृती समितीची गोशाळा

 
धुळे :
वैश्‍विक कल्याणाचा विचार बाळगणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दीनदु:खितांची सेवा करण्यासाठी सतत सरसावलेला असतोच... पण देशाच्या अर्थव्यवस्थेसह सर्वच व्यवस्था आणि समाजाच्या दिनक्रमात परंपरेने गायीला मोलाचे स्थान आहे आणि तिला पवित्र, वंदनीयही मानणारी आपली संस्कृती राहिलेली आहे.
 
 
अशा गोवंशाचे जतन, पालनपोषण आणि संवर्धन करण्याचेही उदात्त कार्य प्रतिकूल परिस्थितीत पण सर्वच समाजबांधवांच्या यथाशक्ती सहकार्याने, मदतीने संघ परिवार करीत आहे. याची साक्ष आहे, धुळ्यातील मेहेंदळे शिवारातील गोशाळा. धुळे शहरापासून ५ कि.मी. अंतरावरील मातोश्री वृद्धाश्रमालगतच ही गोशाळा आहे.
 
 
संघाच्या तत्कालिन जिल्हा संघचालकांच्या नावाने स्थापित व कार्यरत डॉ.के.एम.दुगल स्मृती समितीतर्फे वृद्धाश्रमाच्या बाजूलाच ही गोशाळा चालवली जाते. संघ स्वयंसेवक धीरज भिका बडगुजर या दोन्ही संस्थांचे व्यवस्थापन सांभाळतात. विशेष बाब म्हणजे सक्षम ४-५ आजोबा जमेल तशी कामे करतात आणि मानधनावरील ४ गोप्रेमी सहकारी पूर्णवेळ गायींचा चारा आणि शेणपाणी इ. सेवा देतात..
 
 
काही गायीच दुधाळ असतात, सध्या रोज ७-८ लिटर दूध निघते. ते वृद्धाश्रमात चहापान इ. साठी उपयोगी पडते. शेण- वर्षाला ३-४ ट्रॉली खत मिळते. गेल्या २ वर्षापासून देशी गायींचे मूत्र व शेणापासून तयार केले जाते. शेण आणि जीवामृत आजी-आजोबांसाठी पिकवल्या जाणार्‍या सेंद्रिय भाजीपाल्यासाठी उपयोगात येते. विशेष म्हणजे, शेणापासून गोबर गॅस संयंत्र चालवले जाते. त्याचा उपयोग आजीआजोबांच्या स्वयंपाकासाठी होत इंधनाची बचतही होते.
 
 
खर्च जास्त, उत्पन्न नगण्यसारखेच... या पार्श्‍वभूमीवर गोवंशाचे एकूणच महत्त्व लक्षात घेत भविष्यात या सेवा प्रकल्पाच्या विस्तारासाठी शेड, चारा इ.ची गरज आहे. तसेच गोमूत्र आणि शेणापासून जीवामृतासह अगरबत्ती,धूप, औषधी, साबण इ. पूरक उत्पादनांचाही संकल्प आहे.
 
 
दानशुरांनी आणि शक्य त्या समाजबांधवांनी आपल्या उत्पन्नाचा काही वाटा या सेवाप्रकल्पाला द्यायचे ठरवले तर गोसेवा, गोवंश संवर्धनाचे काम आणि पर्यायाने राष्ट्रसेवा होईल आणि मनोमन समाधान व आनंदही मिळेल. धुळ्यातील गल्ली नं.२ मध्ये लालबागचा राजा हनुमान मंदिराजवळ रोज सकाळी ९॥ ते ११ या वेळात चारा विकत मिळतोे. अनेक गो-भक्त चारा, ढेप खरेदी करतात. अर्थात तेथील कर्मचार्‍याकडून पावती घेत चारा पाठवतात. गोशाळा सुरु झाल्यापासून हा भूतदयेचा उपक्रम सुरु आहे. जन्माष्टमी, मकरसंक्रांत, पाडवा इ. सणवाराला चारा थोडा जास्त दान होतो. काही गो भक्त तर सवत्स धेनूंना गूळ आणतात, पाठवतात.
 
 
मन द्रवले, शेड बांधून दिले...
प्रारंभी गायी वृद्धाश्रमाच्या आवारात उन्हातान्हात, पावसात उभ्या राहत. कारण शेड इ. नव्हतेच.ही बाब पवार-पाटकर कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चे सौ.कुसुमताई श्री.काळू झिपरु पाटकर (आर्वीकर) ( हल्ली नाशिकला वास्तव्य) यांच्या लक्षात आली, आणि त्यांच्या अंत:करणात सहवेदना उमटली... त्यांनी गोशाळेसाठी कै.झिपरु तानाजी पाटकर यांच्या स्मृत्यर्थ २००८ मध्ये हे शेड बांधून दिले. सध्या येथे २० गायी आहेत.
 
 
सध्या रोजची गरज आहे दीड क्विंटल चार्‍याची, पण स्वमालकीचे कुरण किंवा शेती नाही. यामुळे प्रामुख्याने गोभक्त-दानशुरांच्या मदतीवर गायींची उपजिविका होते. उन्हाळ्यात टंचाई जाणवते. अर्थात , रोज सकाळी व सायंकाळी २-२ गायींना परिसरात चरायला सोडलेही जाते.
 
 
* सध्या रोज ७-८ लिटर दूध संकलित आणि वृध्दाश्रमात उपयोगी.
* वर्षभरात ३-४ ट्रॉली शेण खत, परिसरात सेंद्रिय भाज्यांसाठी वापर.
* गोमूत्र आणि शेणापासून तयार जीवामृताद्वारे भाजीपाला उत्पादन.
* शेणापासून गोबर गॅस निर्मिती, स्वयंपाकासाठी उपयोग.
 
@@AUTHORINFO_V1@@