मन, मेंदू आणि ‘मुक्त इच्छा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |


 
माणूस म्हणून आपल्या आयुष्यातल्या काही निवडी तशा आपल्या मुक्त इच्छेचा अनुभव असू शकतात. बरेच शास्त्रज्ञ म्हणतात, आज आपण ज्याला माणसाची ‘मुक्त इच्छा’ म्हणतो ती मुळात मेंदूच्या कार्यपद्धतीचा भाग आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

आपल्याला खरेच कधी असे वाटते का की, आपण आपल्या प्रत्येक कृतीचे मालक किंवा जनक आहोत? आपण जे जे विचार करतो किंवा ज्याचे ज्याचे आयोजन करतो, त्या प्रत्येक गोष्टीचे पूर्ण नियंत्रण आपल्याकडे आहे का? कधी कधी एखादी गोष्ट आपण सहज करून जातो. एखादी गोष्ट पटकन बोलून जातो आणि मग आपल्या मनात विचार येतो की, “काही कळत नाही मला. मी तेव्हा अशी का वागले?” खरंच समजायला मार्ग नाही. बऱ्या च वेळा माणसाला आपल्या भावना, कृती, विचारांवर आपले अजिबात नियंत्रण नाही असे वाटते आणि हा अनुभव तसा प्रचंड घाबरविणारा व निराश करणारा आहे. बऱ्या च वेळा आपल्या खट्याळ, आज्ञापालन न करणाऱ्या द्वाड मुलाबद्दल विचार करताना पालकांना हे कळत नाही की, ती सरळ आज्ञाधारकपणे का वागू शकत नाहीत? का त्यांना जाणीवपूर्वक तसे वागायचे नाही? आता, ती मुले वागू शकत नाहीत किंवा त्यांना जाणीवपूर्वक तसे वागायचे नाही, यातील फरक पाहिला, तर तो तितकासा स्पष्टपणे विभागून अभ्यासणाइतका दिसत नाही. पण, एखादी व्यक्ती एका अमुक पद्धतीने का वागते? किंवा एखादी कृती करण्याचा निर्णय ती कसा घेते? प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारून पाहण्यासारखा हा प्रश्न आहे की, ‘मला काय करायचे आहे, हे मी कसे ठरवितो?’ आपली एखादी कृती ही केवळ एक अचानक घडलेला आकस्मिक आघात असेल तर ती एक अचानक आलेली संधीही आहे. याचाच अर्थ ती कृती ही मी माझ्या स्वत:च्या इच्छेने केलेली नाही. त्याअर्थी मी या कृतीला नैतिकपणे स्वत:ला जबाबदार धरू शकत नाही. पर्यायाने दुसऱ्या कुणीसुद्धा मला जबाबदार धरू नये. पण, जर मी माझ्या पसंतीने एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला, तर माझ्या कृतीचे काहीतरी स्पष्ट कारण आहे. याचाच अर्थ आपण हळूहळू नियतीवादाकडे जातो आहोत का? आपण खरेच मुक्त स्वातंत्र्य भोगतो का? कारण जीन पॉल सात्रे म्हणतात त्याप्रमाणे, एकदा का माणूस या जगाच्या प्रवाहात फेकला गेला की, जे जे काही तो करतो, त्याची जबाबदारी त्याच्या स्वत:वरच असते.

 

आपण काही काळापासून विचार करूया की, मानव मुक्त विचारांचा प्राणी आहे. पण, तरीही आपण या विश्वातील अस्तित्वात असलेल्या कठोर व गतिमान कारभाराचे नियम ग्रहण करू लागलो, तर मानवीमुक्त इच्छेच्या कार्याला तांत्रिकदृष्ट्या कसे वगळू शकतो?  भौतिकशास्त्रातील मुख्य मूलभूत प्रश्नांपैकी या विश्वात मुक्त इच्छेची उपस्थिती आहे का नाही? याबाबत बऱ्या च गोष्टी अवलंबून नसतात. फिनिक्सच्या कल्पनेप्रमाणे निसर्ग एखाद्या यंत्रणेसारखे काम करतो. मशीनप्रमाणे काम करणारा निसर्ग विविध कार्यक्षमतेमधून शेवटी एक विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो. कदाचित काही वेळा दिसणारे नैसर्गिक थैमान निसर्गाच्या मुक्त इच्छेचे अस्तित्व असावे असे वाटते.

 

माणूस म्हणून आपल्या आयुष्यातल्या काही निवडी तशा आपल्या मुक्त इच्छेचा अनुभव असू शकतात. बरेच शास्त्रज्ञ म्हणतात, आज आपण ज्याला माणसाची मुक्त इच्छा म्हणतो ती मुळात मेंदूच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. आपण कधी कुणाला चांगल्या संवेदना वा स्पंदने द्यायची भाषा करतो, जेणेकरून त्याने काही चांगले करावे वा त्याचे चांगले व्हावे. पण, आपला कॉमनसेन्स मात्र आपल्याला निश्चितच कल्पना देतो की, एखाद्या व्यक्तीने केलेल्या त्या चांगल्या गोष्टींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण दिलेल्या स्पंदनाशी तसा काही संबंध नाही.

 

आज शास्त्रज्ञ आपण जे काही विचार करतो, बोलतो-वागतो या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूने आपल्याला जाणीव व्हायच्या आधी केलेल्या आहेत. मग आपण स्वतःचे मुक्त स्वातंत्र्य नसलेले प्राणी आहोत का? खरे तर काही मानसशास्त्रज्ञांनी आपले बरेच सिद्धांत ‘मुक्त इच्छा’ या संकल्पनेवरच मांडले आहेत. आपण आपली ‘मुक्त इच्छा’ नाहीच आहे असे मानले आणि त्यामुळे आपण जे जे काही बरेवाईट करतो ते फक्त मेंदूच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असे म्हटले तर आपल्या वागण्याची जबाबदारी आपण घेणार नाही. यामुळे जगात भयानक गोंधळ होईल. गुन्हेगारांची विकृत वागणूक वाढेल, सतपुरुषांनी जगाला दिलेल्या सविचारांची व सद्गुणांची आपल्याला कदर राहणार नाही. विधायक व्यक्तींना त्यांच्या गुणांमुळे प्राप्त झालेला सन्मान आपण ठेवणार नाही.

 

एकूण काय, मेंदूच्या शास्त्राला आज अवगत असलेल्या ज्ञानामुळे आपल्याला बऱ्या च गोष्टी कळायला लागल्या, असे मान्य केले तरी बऱ्या च गोष्टींचा विशेषतः मानवी वागण्याचा व मेंदूचा खोल शोध लागायचा बाकी आहेच. तोपर्यंत आपल्याला आपल्याशी व जगाशी जबाबदारीने वागण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. आपण आपले या जगातले अस्तित्व या जगाला समजून उमजून, त्यातल्या हिताचा अर्थ जाणून जगत राहणे आवश्यक आहे. शेवटी आपल्या वागण्याला व विचारांना सामाजिक बांधिलकीची व मानवी नैतिकतेची मर्यादा आहे, हे आपण कधीच नाकारू शकत नाही.

 

डॉ. शुभांगी पारकर

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@