होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे औषध सिद्धता - ( भाग-1)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |




औषध सिद्धता ही एक सुव्यवस्थित व नियोजनबद्ध क्रिया आहे. ज्यामध्ये औषधाचे रोगनिवारक गुणधर्म, आजार बरे करण्याची ताकदही तपासली जाते. त्यासाठी ही औषधे निरोगी माणसांवर सिद्ध केली जातात.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

होमियोपॅथी या औषधशास्त्रात जी औषधे वापरली जातात, ती सर्व निसर्गातील घटकांपासून बनवली जातात. वनस्पतीजन्य (plant kingdom)प्राणिजन्य (animal kingdom) व खनिजजन्य (mineral kingdom) असे मुख्यत्वे त्यांचे स्रोत असतात. निसर्गात उपलब्ध असणारी ही औषधे कच्च्या किंवा ढोबळ (र्लीीवश) स्वरूपात असतात. तसेच कच्च्या औषधाचे होमियोपॅथीक औषधांमध्ये रुपांतर करण्यासाठी औषधनिर्मिती शास्त्रात अनेक प्रयोग व पद्धती आहेत, ज्यामुळे या नैसर्गिक घटकांचे औषधी गुणधर्म प्रामुख्याने वापरले जाऊ शकतात.

औषधे जरी निर्माण होऊन तयार असली तरी त्याची उपयुक्तता व औषधी गुणधर्म हे पडताळून पाहावे लागतात. या प्रक्रियेला ‘औषध सिद्धता’ किंवा असे म्हणतात. आता आपण ही ‘औषध सिद्धता’ म्हणजे काय व होमियोपॅथीत ही औषधे कशी जोडली जातात, हे पाहुया.

डॉ. हॅनेमान यांनी जेव्हा होमियोपॅथीत संशोधन केले, तेव्हा त्यांनी होमियोपॅथीच्या ‘औषध सिद्धते’चे काही नियम व परिमाणे निश्चित केली. ही परिमाणे व नियम हे पूर्णत: निसर्गाच्या नियमांना अनुसरुनच होती(natural law of curse) ‘औषध सिद्धता’ म्हणजे काय?

Drung Proving म्हणजेच ‘औषध सिद्धता.’ ही एक सुव्यवस्थित व नियोजनबद्ध क्रिया आहे. ज्यामध्ये औषधाचे रोगनिवारक गुणधर्म, आजार बरे करण्याची ताकदही तपासली जाते. त्यासाठी ही औषधे निरोगी माणसांवर सिद्ध केली जातात.

औषध सिद्धतेचे नियम

1) औषध सिद्धतेसाठी डॉ. हॅनेमान यांनी निरोगी माणसांची सिद्धक (prover) म्हणून निवड केली. ज्याच्यावर ‘औषध सिद्धता’ केली जाते, अशा निरोगी माणसाला ‘सिद्धक’ (prover)म्हणतात. आता ही ‘सिद्धता’ इतर औषधशास्त्राप्रमाणे प्राण्यांवर का केली जात नाही, असा प्रश्न आपल्याला पडणे हे स्वाभाविक आहे. त्याचीही व्यवस्थित कारणे डॉ. हॅनेमान यांनी दिली आहेत.

) औषधे ही प्राण्यांवर सिद्ध केली, तर ‘व्यक्तिनिष्ठ लक्षणे’ (subjective) आणि ‘मानसिक लक्षणे’ अभ्यासता येत नाहीत. कारण, ही लक्षणे बोलल्याशिवाय कळू शकत नाहीत. त्यामुळे औषधाचा मानवी शरीरावर नक्की काय परिणाम होतो, हे कळू शकत नाही. इतर औषध पद्धतींमध्ये प्राण्यांवर औषधे सिद्ध करतात; कारण त्यांना फक्त पेशींमधील होणारे बदल पाहायचे असतात. होमियोपॅथी ही माणसाच्या पेशींच्याही मागे जाऊन विचार करते, म्हणून औषधे ही निरोगी माणसांवरच सिद्ध केली जातात.

ब) प्राणी बोलू शकत नसल्यामुळे विविध औषधांमधील फरक ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे ‘औषध सिद्धते’मध्ये चुका होऊ शकतात.

) बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की, एखाद्या औषधाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम व प्राण्यांच्या शरीरावर होणारा परिणाम, हा अतिशय वेगळा असू शकतो. या शिवाय एकाच औषधाचा वेगवेगळ्या प्राण्यांवर होणारा परिणामही अतिशय भिन्न असा असू शकतो आणि म्हणूनच प्राण्यांवर केली गेलेली ‘औषध सिद्धता’ ही मानवी शरीर व मन यांच्यासाठी उपयुक्त ठरत नाही. काही उदाहरणे आपण पाहूया-

1) एखादे डुक्कर ‘नक्स व्होमिका’ या औषधाच्या खूप मात्रा खाऊ शकते. पण, हेच ‘नक्स व्होमिका’ त्याच मात्रेत माणसाला दिले तर ते घातक ठरते.

2) ‘खसखस’ (opium) हे औषध घोड्यांवर काहीही परिणाम करत नाही. पण, थोड्याशा प्रमाणात माणसाने घेतले, तर लगेच परिणाम दिसतात.

3) ‘बेलाडोना’ या औषधाचा सशांवर काहीही परिणाम होत नाही. पण, माणसांवर त्वरीत होतो.

4) ‘मॉर्फीन’मुळे कुत्रे गुंगीत जातात, तर मांजरी उद्दीपित होतात. हे प्राण्यांवरील व माणसांवरील औषध मात्रेचे भिन्न परिणाम आहेत.

पुढील भागात आपण या ‘औषध सिद्धते’विषयी अधिक जाणून घेऊया.

 
 

डॉ. मंदार पाटकर

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@